औरंगाबाद : कोरोनाचा कहर सध्या शहरात थायमन घालत आहे अश्या वेळी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी बाबाजनगर वाळूज येथे भर संचारबंदीत तब्बल ४० ते ५०० जाणं समवेत जलवाहिनेचे उदघाटन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश असताना देखील त्यांनी संचारबंदीचा नियम भंग केला आहे. दरम्यान त्यांच्यावर आणि त्याच्या सोबत असलेल्या ३० जणांवर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद शहरात दिवसं दिवस वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोज सर्व सामान्य जनतेची परवड होत असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार यांचे हे कृत्य कितपत योग्य आहे हा प्रश्न आता सर्व स्थरातून उपस्तिथीत होत आहे.