औरंगाबाद महापालिका निवडणूक प्रमुखपदी आमदार अतुल सावे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । एप्रिलमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार अतुल सावे यांची शनिवारी निवडणुक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. मुकुंद कुलकर्णी यांनी हे पत्र अतुल सावे यांच्यापर्यंत पोहचवलं आहे.

नियुक्ती झाल्यावर आमदार सावे म्हणाले, विरोधी पक्षनेते प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विश्वासाने माझ्यावर निवडणुकीच्या प्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे.

२०१५ च्या महापालिका निवडणुकीच्या वेळीही माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आली होती. त्यावेळी प्रामाणिकपणे काम करत भाजपचे नगरसेवक निवडून आणले. आता पुन्हा जबाबदारी आल्याने आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत-जास्त उमेदवार निवडून आणण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे. या निवडणुकात भाजपतर्फे ८० ते ९० जागा लढविण्यात येणार आहेत. युती नसल्याने भाजप स्वबळावर निवडणुकात उतरणार असेही आमदार सावे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment