औरंगाबाद : गुरुवार पासून औरंगाबाद शहर व जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी अंशतः लॉकडाऊनला प्रतिसाद देत रात्री 9 च्या आत घरात राहणे पसंत केले. बाजारपेठेत 9 नंतर शुकशुकाट झाला होता.
11 मार्च ते 4 एप्रिल पर्यन्त शहर व जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. काल रात्री 9 वाजे नंतर बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक सुरु होती. औषधांची दुकाने, दवाखाने सुरु होती. पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे व्यावासायिकांना दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. वाहनांचे राऊंड शहरातील गल्ली बोळात सुरु होते. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रात्री 8.30 वाजेपासून मुकुंदवाडी हद्दीतील बाजारपेठ बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरले असल्याचे पाह्यला मिळाले होते.
शनिवार व रविवारी संपूर्ण बाजरपेठ बंद असणार असून लॉकडाऊन नागरिकांच्या हितासाठी करण्यात आला आहे. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी गर्दी न करता करुन घ्यावी. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाई करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आरोग्य सेवा 9 नंतरही सुरु राहणार असून अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.किराडपूरा, कटकटगेट, रोशनगेट, शहागंज, गणेश कॉलनी, सिटीचौक, गुलमंडी, तिलकपथ, औरंगपूरा, सिडको, हडको व पूर्ण शहर रात्री 9 नंतर सामसूम झाले होते. काही प्रमाणात ऑटो, मालवाहतूक गाड्या मात्र सुरु होत्या.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group