औरंगाबादेत आज पुन्हा तब्बल ५७ नवीन कोरोनाग्रस्त; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९५८ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज पुन्हा तब्बल ५७ नवीन कोरोना रुग्ण वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९५८ वर पोहोचली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. औरंगाबाद शहरातील जालान नगर (1), उलकानगरी (1), रोहिदास हाऊसिंग सोसायटी (1), संजय नगर (1), सातारा परिसर (1), गणपती बाग, सातारा परिसर (6), विद्यानगर, सेव्हन हिल (1) , एन सहा,सिडको (1), पुंडलिक नगर (5), हुसेन कॉलनी (8), राम नगर (3), बहादूरपुरा (8), बारी कॉलनी, गल्ली नं. दोन (1), कबाडीपुरा, बुड्डीलेन (3), शरिफ कॉलनी (3), बाबर कॉलनी (3), सिंधी कॉलनी (1), न्याय नगर (1), न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी (1),सिल्क मिल कॉलनी (1), घाटी (1), रेंटीपुरा (1), अन्य (2) तर कन्नड तालुक्यातील देवळाणा (2) या भागातील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत, असेही कळवण्यात आलेले आहे.

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद प्रशासनाकडून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रुग्णांची संख्या आटोक्यात यावी याकरता अनेक हॉटस्पॉट बनलेले शहरातील परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून तेथे नागरिकांना रस्त्यांवर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Leave a Comment