मला आता कारणे सांगू नका, पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावा ; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या अधिकाऱ्यांना सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद येथे सध्या पाणी प्रश्न चांगलाच निर्माण झाला आहे. यावरून मागील आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आता 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादला सभा होणार आहे. त्यापूर्वी ठाकरे यांनी आज औरंगाबाद येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी येथील पाणी प्रश्नाच्या कामासंदर्भात अधिकारी कारणे दाखवू लागल्या मुख्यमंत्र्यानी त्यांना चांगलेच सुनावले. मला कारणे सांगत बसू नका, कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा प्रश्न मार्गी लावा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

औरंगाबादमधील पाणी पुरवठ्याच्या मुद्यावरून आज उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांत अधिकाऱ्यांनासुनावले. यावेळी ते म्हणाले की, “कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. नवीन योजना पूर्ण होई पर्यंत कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे. तसेच पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या नागरिकांना योग्य पद्धतीने पाणी मिळेल हे पहावे, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

त्याच्याप्रमाणे यावेळी उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या 1680 कोटी रुपयांची ही योजना गतीने पूर्ण व्हावी म्हणून या योजनेचा कालबध्द रीतीने आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घ्यावा, असे म्हंटले. तसेच या योजनेला वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काहीही कमी पडू देणार नाही, यातील उणिवा प्राधान्याने दूर करून शहरातील नागरिकांना व्यवस्थित पिण्याचे पाणी मिळेल असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment