औरंगाबाद जिल्ह्यात कलम 144 नुसार संचारबंदी लागू; काय सुरु अन् काय बंद राहणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : कोरोना  विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेच्‍या आरोग्‍यास धोका निर्माण होण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे लोकांच्‍या एकत्र येण्‍यास  प्रतिबंध करणे आवश्‍यक आहे. त्‍यानुसार जिल्ह्यात वेळोवेळी लॉकडाऊनचे आदेश निर्गमित करण्‍यात आलेले आहेत.

सद्यस्थितीत औरंगाबाद जिल्‍ह्यात कोव्‍हीड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असून त्‍याचा प्रतिबंध करण्‍यासाठी संपूर्ण औरंगाबाद जिल्‍ह्यात लॉकडाऊन करणे आवश्‍यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी औरंगाबाद व पोलीस आयुक्‍त, औरंगाबाद (शहर) प्राप्‍त  अधिकारानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार 30 मार्च 30 च्या मध्‍यरात्रीपासून गुरुवार 8 एप्रिलपर्यत संचारबंदी आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. या मनाई आदेशादरम्‍यान काही बाबी मर्यादित स्‍वरूपात निर्बंधासह सुरु राहतील. हे आदेश अंमलात असताना पाच किंवा त्‍यापेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना एकत्र येण्‍यास प्रतिबंध करण्‍यात येत आहे.

त्‍याचप्रमाणे अत्‍यावश्‍यक बाबी वगळता नागरिकांची हालचाल पूर्णपणे प्रतिबंधीत राहील. या आदेशाची अंमलबजावणी व कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी व संबंधीत वार्डाचे वार्ड अधिकारी व त्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे महानगरपालिकेचे सर्व संबंधित अधिकारी, तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्‍त लॉकडाऊन पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, अव्‍वल कारकून यांना संबंधित पोलीस हवालदार व त्‍यापेक्षा वरिष्‍ठ दर्जाचे पोलीस अधिकारी, विविक्षीतपणे नेमलेले अधिकारी, कर्मचारी, ग्राम व नगर विकास विभागाचे सर्व अधिकारी/कर्मचारी आणि महसूल अधिकारी/कर्मचारी या आदेशाची नोंद घेऊन त्‍याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत दक्षता घेतील.

महानगरपालिका, महसूल व पोलीस विभाग यांची संयुक्‍त पथके गठीत करण्यात आली आहेत. आहेत. तसेच महाराष्‍ट्र   शासनाचे इतर विभाग जसे अन्‍न व औषध प्रशासन, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभाग, परिवहन विभाग, पुरवठा विभाग इत्‍यादींचे अधिकारी यांचा पथकामध्‍ये समावेश  राहील. या  संबंधात  जिल्‍हाधिकारी यांनी दिलेल्‍या आदेशाप्रमाणे या इतर विभागांचे अधिकारी कार्यवाही करतील. नगरपालिका, नगर पंचायत, महसूल व पोलीस विभाग यांची संयुक्‍त पथके गठीत करण्यात येतील.

*पूर्णपणे प्रतिबंधित बाबी आणि सेवा*

कोणत्‍याही परिस्थितीत 5 पेक्षा जास्‍त लोकांनी सार्वजनिक जागेत एकत्र येण्‍यास प्रतिबंध असेल,
सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी माॅर्निग वाॅक आणि इव्हीनिंग वाॅक प्रतिबंधीत राहील, उपहार गृह, बार, लॉज, हॉटेल्‍स (कोव्‍हीड-19 करिता वापरात असलेले वगळून) रिसॉर्ट, शॉपींग मॉल, बाजार, मार्केट संपूर्णतः बद राहतील.

सर्व केश कर्तनालय, सलून, ब्‍युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील. तथापि ऑनलाईन वर्ग सुरु राहतील, स्‍थानिक, सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी वाहने संपूर्णतः बंद राहतील.

ऑटोमध्‍ये फक्‍त  2 प्रवाशांना मास्‍कसह प्रवास अनुज्ञेय राहील. स्‍थानिक, सार्वजनिक  व खासगी बस सेवा, ट्रक, टेम्‍पो, ट्रेलर, ट्रॅक्‍टर इत्‍यादींसाठी संपूर्णतः बंद राहतील.

दूध, किराणा माल, पेट्रोल, डिझेल, गॅस, उद्योग सुरु राहतील, सर्व प्रकारचे बांधकाम, कन्‍स्‍ट्रक्‍शनची कामे संपूर्णतः बंद राहतील. मंगल कार्यालय, हॉल, लग्‍न समारंभ, स्‍वागत समारंभ, वाढदिवस, लग्‍नाचा वाढदिवस असे कार्यक्रम सार्वजनिकरित्‍या करता येणार नाहीत. धार्मिक स्‍थळे, सार्वजनिक प्रार्थनास्‍थळे संपूर्णतः बंद राहतील.  सर्व प्रकारचे मोर्चा, धरणे आंदोलन, उपोषण इ. वर निर्बंध राहतील. सर्व देशी/विदेशी वाईन इ. मद्य विक्रीचे दुकाने बंद राहतील.