दुसऱ्यादिवशीही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने औरंगाबादकर त्रस्त; खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा फटका दुसऱ्यादिवशीही औरंगाबादकरांना बसला आहे. आजही शुक्रवारी देखील पूर्ण क्षमतेने एसटी बसेस धावत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहे. अनेकांना इच्छा नसतानाही खासगी वाहनाने अतिरिक्त पैसे मजवून प्रवाश करावा लागत आहे.

दुसरीकडे औरंगाबादमधील शहर बससेवाही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नाईलाजास्तव शहरवासीयांना रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. येथील सिडको बसस्थानकात सकळापासूनच प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे बसची वारंवारित कमी आहे. जर एखादी बस मिळाली तर त्यात मोठ्याप्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे.

औरंगाबादहून मंठ्यासाठी 300 तर बीडसाठी तब्बल 200 रुपये खासगी वाहने सर्वसामान्यांकडून घेत आहे. त्यात दिवाळीचा सण आला आहे. त्यामुळे बहुतेक लवकरात-लवकर घरी पोहोचण्याच्या घाईत आहेत. याचाच फायदा घेऊन खासगी वाहनधारक प्रवाशांची लूट करत आहेत.