प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत पाहून प्रियकराचा चढला पारा; रक्तबंबाळ होईपर्यंत झोडलं

aurangabad boy beaten girl
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर आपण संशयाची वृत्ती ठेवून बायकोला, गर्लफ्रेंडला मारहाण केल्याच्या कित्येक घटना ऐकल्या आहेत. अशा घटनांमध्ये पोलिसांनी देखील आरोपींवर कडक कारवाई केल्याचे पाहिले आहे. मात्र तरीदेखील अशा घटनांना आळा बसण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. आता नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यात अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. औरंगाबादमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. आपल्या प्रियसीला दुसऱ्या एका मुलासोबत पाहिल्यामुळे डोक्यात याचा राग धरून एका तरुणाने त्या मुलीला बेदम मारहाण केली आहे.या घटनेवर चहूबाजूंनी संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, या आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील वसई बोदवड येथे ही सर्व घटना घडली आहे. याठिकाणी आपल्या प्रियसीला मारहाण करणाऱ्या तरुणाने एका दुसऱ्या मुलासोबत पाहिले. त्यामुळे डोक्यात राग धरून या तरुणाने तिथेच प्रियसीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिला या तरुणाने एवढे मारले की, शेवटी ती रक्तबंबाळ झाली. सुरुवातीला यात तरुणाने प्रेयसीशी वाद घालण्यास सुरुवात केली. तुझ्या मुलासोबत काय करत आहे तसेच तू मला का सांगितले नाही असे अनेक प्रश्न तरुणाने प्रियसीला विचारले.

मात्र प्रियसीने सांगितलेल्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसत नसल्यामुळे तरुणाने शेवटी रागात आपल्या प्रियसीला मारण्यास सुरुवात केली. प्रियसी विनंती करत असताना देखील त्या तरुणाचा राग शांत झाला नाही. तो फक्त तिला मारतच राहिला. लाथा बुक्क्यांचा मार बसल्यामुळे ही तरुणी जोरजोरात रडत होती. मात्र तरी देखील या तरुणाला तिची दया आली नाही. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या इतर व्यक्तींनी या मारहाणीचा व्हिडिओ शूट केला. तसेच या व्हिडिओला सोशल मीडियावर देखील अपलोड करण्यात आले.

आता या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यामुळे नेटकऱ्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या राज्यात महिला हिंसाचारांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस महिलांना मारहाणीच्या तसेच बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. या संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसत आहे.