औरंगाबादकरांनो सावधान ! लोडशेडिंगचे संकट वीज जपून वापरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील एकूण 3330 मेगावॉट क्षमतेचे संच बंद पडले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शहरात लोडशेडिंग अटळ असल्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे विजेची तूट भरून काढण्यासाठी ग्राहकांनीही वीजेचा वापर जपून करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, विजेची तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते 10 या वेळेत विजेचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

अतिवृष्टीमुळे खाणींमधून कोळशाचा पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच औष्णिक वीजनिर्मिती घटली आहे. महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील 13 संच कोळशा अभावी बंद आहेत. महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी 210 मेगावॅटचे तसेच पारस 250 मेगावॅटचे आणि भुसावळ व चंद्रपूर येथील 500 मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद आहे. कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे 640 मेगावॅटचे चार संच आणि अमरावतीतील रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे 810 मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतून मिळणाऱ्या विजेत घट झाली आहे.

Leave a Comment