औरंगाबाद – नवरात्रीचा उत्सव आल्याने शहरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे. कोरोनाच्या फैलावामुळे मागील दोन वर्षांपासून सर्व उत्सव घरातूनच साजरे करणाऱ्या औरंगाबादकरांना यंदा मात्र आपल्या लाडक्या श्रद्धापीठांना भेट देता येणार आहे.
राज्य सरकारच्या आदेशांनुसार, शहरातील सर्व मंदिरे गुरुवारपासून खुली करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्वात प्राचीन समजले जाणारे कर्णपुरा देवीचे मंदिरदेखील भाविकांच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. देवीच्या दर्शनासाठी येत्या 07 ऑक्टोबर पासून कर्णपूरा देवीचे मंदिर 17 तास खुले राहणार आहे.
कर्णपुरा देवी मंदिरातील व्यवस्था
– घटस्थापनेपासून संपूर्ण नवरात्रोत्सवात भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येणार
– दर्शनाच्या रांगेत एक-एक मीटरच्या अंतरावर उभे रहावे लागणार
– सकाळी 5.30 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत भक्तांना दर्शन घेता येणार
– मास्कशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक राजू दानवे यांनी दिली.