कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
अब्बू आझमी यांनी औरंगजेब यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आ. संजय गायकवाड यांच्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कराड येथे या वक्तव्याचा समाचार घेतला. क्रूरकर्मा राजा म्हणून ओळखला जात होता. त्यांना कोणी दयाळू म्हणत असेल तर त्यांनी इतिहासाचा एकदा अभ्यास करावा, असा सल्ला दीपक केसरकर यांनी दिला आहे.
कराड येथे शिक्षण मंत्री दीपक केसरकर टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवासाठी आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ज्याने संभाजी महाराजांचे डोळे काढले. त्यांच्या अंगा-अंगाची लाही केली. त्यांचे डोळे काढले गेले, केवळ धर्मांतर केले नाही म्हणून असे केले गेले. शीख धर्माचा धर्मगुरू यांनाही त्याने जिवे मारले. त्याच्या मुलांनाही औरंगजेबाने मारले. त्यामुळे त्यांना दळवी म्हणणाऱ्यांनी इतिहासाचा पुन्हा एकदा अभ्यास करावा.
https://www.facebook.com/watch/?v=5572366492890659&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=2Rb1fB&ref=sharing
शिक्षणमंत्री दीपक केसरकर 3 तास लेट, हजारो विद्यार्थी ताटकळले
शिक्षणमंत्री दीपक केसरकर कराड येथील टिळक हायस्कूल व शिक्षण मंडळाच्या शताब्दी महोत्सवासाठी दि. 16 जानेवारी रोजी उदघाटन कार्यक्रमाला येणार होते. त्यावेळी ते आले नाहीत. त्यानंतर त्यांनी 22 रोजी समारोपास येण्याचे कळविले. त्यामुळे शिक्षण मंडळाचे हजारो विद्यार्थी 3.30 वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी जमले होते. परंतु शिक्षणमंत्री यांच्या दाैऱ्यात विस्कळीतपणा आला अन् तब्बल 3 ते साडेतीन तास उशिरा पोहचले. त्यामुळे हजारो विद्यार्थी, संयोजक आणि शिक्षक वर्ग ताटकळल्याचे पहायला मिळाले.