AUS vs IND: सिडनी कसोटीआधी भारताला आणखी एक धक्का!; ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळं संघाबाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिडनी । भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघातील सलामीवीर लोकेश राहुल दुखापतीमुळे उर्वरीत दोन सामन्यातून बाहेर झाला आहे. लोकेश राहुल सराव करताना जखमी झाला. यामुळे आता तो पुढील दोन्ही लढतीसाठी उपलब्ध असणार नाही. मेलबर्नमध्ये शनिवारी भारतीय संघ नेटमध्ये सराव करत असताना त्याच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला किमान ३ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती बीसीसीआयने मंगळवारी दिली.

बीसीसीआयने राहुलच्या दुखापतीसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, मेलबर्न मैदानावर भारतीय संघ सराव करत असताना राहुलच्या मनगटाला दुखापत झाली. या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी आणि फिट होण्यासाठी त्याला किमान ३ आठवडे इतका वेळ लागू शकतो. आता राहुल मायदेशात परतणार आहे आणि बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे दाखल होइल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यासाठी राहुलला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जखमी झालेले भारतीय खेळाडू
१) मोहम्मद शमी
२) उमेश यादव
३) लोकेश राहुल

आयपीएलमध्ये दुखापत झाल्याने इशांत शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळता आले नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’