हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली शानदार विजय मिळवला. विराट कोहलीच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणेने संघाचे जबरदस्त नेतृत्व करत यजमान ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चित केलं आहे. त्यानंतर जगभरातून अजिंक्य रहाणेवर कौतुकाचा वर्षाव झाला. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी देखील त्याची प्रशंसा केली आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फो सोबत बोलताना दिग्गज खेळाडू इयान चॅपेल म्हणाले, “ही आश्चर्याची बाब नाही की, अजिंक्य रहाणेने मेलबर्न येथील सामन्यात भारतीय संघाचे शानदार नेतृत्व केले. कोणत्याही व्यक्तीने त्याला 2017 साली धरमशाला येथे नेतृत्व करताना बघितले असेल, तर तो व्यक्ती समजेल की, या माणसाचा जन्म क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्यासाठी झाला आहे.”
“धरमशाला येथील सामन्यात माझे लक्ष वेधले, जेव्हा अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करणार्या डेविड वॉर्नर आणि स्मिथ यांना रोखण्यासाठी पदार्पण करणार्या कुलदीप यादवला आक्रमणासाठी बोलवले. हे एक साहसी पाऊल होते. मला वाटते, हे पाऊल हुशारीचे ठरले. यादवने वार्नरची विकेट घेतली आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या स्लिप मध्ये झेल घेतला. त्यानंतर भारतीय संघाने विजय मिळवला. हा रहाणेच्या यशाचा भाग आहे. तो धाडसी आणि चलाख आहे. ”
इयान चॅपेल पुढे म्हणाले, त्याच्या नेतृत्त्वात या दोन व्यतिरिक्त बरेच गुण आहेत. जेव्हा काही गोष्टी हातातून निसटून जात असतात, तेव्हा तो शांत राहतो. त्याने आपल्या साथीदारांचा सन्मान जिंकला आहे. जो की नेतृत्वचा सर्वात मोठा भाग असतो. तो गरजेच्या वेळी धावा काढतो. ज्यामुळे त्याच्या संघाच्या मनात त्याच्याबद्दल सन्मान वाढतो.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’