….म्हणून सुशांत होता नाराज ; प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन आता बरेच दिवस झाले मात्र दररोज या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत असते. . यामध्येच आता ‘छिछोरे’चं क्रेडिट न मिळाल्यामुळे सुशांत नाराज झाला होता, असं प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी म्हटल्याचं वृत्त समोर आलं आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘छिछोरे’ या चित्रपटाने चांगली कमाई केली. चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र यासाठी सुशांतला कोणीच क्रेडिट दिलं नाही. पण बिचारा सुशांत काही बोलूसुद्धा शकत नव्हता. तो नाराज होता आणि याविषयी त्याने दिग्दर्शक अभिषेक कपूरसोबत देखील चर्चा केली होती”, असं चेतन भगत म्हणाले.

चेतन भगत पुढे म्हणाले, “काही ठराविक पत्रकारांचादेखील एक व्हॉट्स अॅप ग्रुप आहे. यामध्ये ६ पैकी चार पत्रकार तर कायम सुशांतविषयी नकारात्मक लेख लिहायचे. अनेकजण सुशांतविषयी ब्लाइंड आर्टिकल लिहीत होते जे संपूर्ण कलाविश्वात वाचलं जाई. त्यामुळेही सुशांतला त्रास होत होता. याविषयी देखील सुशांतने अभिषेकला सांगितलं होतं. अभिषेक कपूर आणि सुशांतने ‘काइ पो छे’ आणि ‘केदारना’थ या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं”.

सुशांतने आत्महत्या करुन जीवन संपवलं यावर विश्वास ठेवणं खरंच कठीण आहे. सुशांत प्रकरणात जे काही दिसून येतंय ते प्रत्यक्षात वेगळं आहे असं माझं मत आहे, असंही चेतन भगत म्हणाले. सध्या सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयची विशेष टीम तपास करत असून रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’