पुण्याहून गावाकडे जाणार्‍यांची राष्ट्रीय महामार्गावर रिघ; गर्दी टाळण्यासाठी टोलमाफ होणार का?

सातारा प्रतिनिधि | आज संध्याकाळपासून पुण्याहून गावाकडे जाणार्‍यांची राष्ट्रीय महामार्गावर अक्षरशः रिघ लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी सर्व खाजगी कार्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने सर्वजणांनी गावाकडचा रस्ता धरला आहे. यामुळे आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून शासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोलनाक्यांना बंद ठेवण्याचे … Read more

चोरट्यांकडून मेडिकल दुकान फोडून सॅनिटायझर व मास्कची चोरी

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्याचा अचलपूर येथे एकाच रात्री चोरट्याने तीन मेडिकलची दुकाने फोडून त्यातील मास्क व सॅनिटायझर चोरून नेले आहे. त्याचबरोबर दुकानातील काही पैसे सुद्धा चोरून नेल्याचे उघड झाले आहे. अचलपुरातील प्रवीण एजन्सी, गौरव मेडिकल व कृष्णा मेडिकल येथे काल एका पंचेचाळीस ते पन्नास वर्षीय चोरट्याने रेनकोट, रॉड व चाकूच्या सहाय्याने मेडिकल … Read more

कोरोनामुळे सांगली महापालिकेची क्रीडांगणे बंद, स्थायीची सभा रद्द

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मॉल्स, चित्रपटगृहांच्यानंतर उद्याने कुलुपबंद झाली होती. आता आज पासून महापालिकेच्या क्रीडांगणेही बंद करण्यात आली आहेत. तर गुरुवारी होणारी स्थायी समितीची सभा आयुक्त नितीन कापडणीस यांनी रद्द केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सतर्क आहे. महापालिकेने क्वारंटाईन कक्षही सुरू केला आहे. तसेच जवळपास शंभर खाटांचे आयसोलेशन कक्षही … Read more

वैष्णोदेवीची यात्रा आजपासून बंद; इतिहासात पहिल्यांदाच घेतला निर्णय

कटरा | जगभरात कोरोनाचा थेमान सुरु असून देशात कोरोनाचे १४७ पोझिटिव्ह रुग्न सापडले आहेत. आता वैष्णोदेवी यात्रेवरही कोरोना परिणाम झाला आहे. वैष्णोदेवीची यात्रा आज पासून बंद करण्याचा निर्णय जम्मू काश्मिर सरकारने घेतला आहे. इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील बससेवाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. राज्यात बाहेरुन येणाऱ्या कोणत्याही बससेवा सुरु न ठेवण्याचा मोठा निर्णय जम्मु … Read more

नक्षलवाद्यांचा कट गडचिरोली पोलिसांनी ‘असा’ लावला उधळून

गडचिरोली प्रतिनिधी | गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या पोलिसांवर भुसूरूंग स्फोटाद्वारे हल्ला करण्याचा नक्षलवाद्यांचा कट उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. केंद्रीय राखीव पोलिस दल आणि महाराष्ट्र पोलिस जवानांना लक्ष करून नक्षलवाद्यांनी हा मोठा कट रचला होता. हा कट उधळून लावल्यामुळे नक्षली मनसुबे यशस्वी होऊ शकले नाहीत.यामुळे कित्येक पोलिस जवानांवर आलेले संकट परतवून लावण्यात … Read more

कामयाब चित्रपटगृहात जाऊनच पहायला हवा! वाचा परिक्षण

चित्रपट परिक्षण । हा चित्रपट मोठ्या कलाकाराला घेऊन चित्रपट हिट करता आला असता, पण दिग्दर्शकाने खऱ्या आयुष्यातील साईड अक्टर्स ना घेऊन हा चित्रपट बनवण्याचा खूप मोठा निर्णय घेतला आणि तिथेच तो जिंकला. हा चित्रपट हाउसफुल चा बोर्ड लावणार नाही कदाचित, पण चित्रपट रसिकांचं मन भरून टाकेल. लेखक-दिग्दर्शक हार्दिक मेहता यांचा ‘कामयाब’ बॉलिवूडमधील सहकलाकार म्हणून रिटायर्ड … Read more

आता घरीच बनवा केएफसीचा ‘चिकन पाॅपकार्न’

खाऊगल्ली | चिकन पाॅपकार्न खायचं झाल की आपण नेहमी केएफसी कडे धाव घेतो. परंतु घरी बनवलेले चिकन पाॅपकार्न हे केएफसी पेक्षा उत्तम आणि चविष्ट वाटतात. हे बनवायला अगदी सोप्पे आणि स्वस्त आहेत. तर मघ करून पाहणार ना?? साहित्य – बोनलेस चिकन(तुकडे) २ टेस्पून मैदा १ टेस्पून काळेमिरं पावडर १ टेस्पून तिखट १/२ टीस्पून गरम मसाला … Read more

मी ज्योतिरादित्यला चांगलं ओळखतो ; राहुल गांधींनी सांगितले काॅलेज पासून सोबत असणार्‍या मित्राचे काँग्रेस सोडण्याचे ‘हे’ कारण

दिल्ली | मी ज्योतिरादित्य सिंधिया यांना खूप चांगलं ओळखतो. मी आणि ज्योतिरादित्य काॅलेजमध्ये सोबत होतो असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितले आहे. दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना गांधी यांनी सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाबाबत आपले मत व्यक्त केले. Rahul Gandhi, Congress: This is a fight of ideology, on one … Read more

प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभा; खैरे, रावतेंचा पत्ता कट! शिवसेनेत धुसफूस

मुंबई | काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी घोषित झाली आहे. चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांना डावलण्यात आल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे. याबाबत प्रतिक्रिया देतांना चंद्रकांत खैरे म्हणाले की – पक्षात जुन्या नेत्यांचीही गरज असते; संधी मिळाली असती तर बळ मिळाले असते. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत खैरे … Read more

उदयनराजे भोसले, रामदास आठवलेंना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर

दिल्ली | भाजपने राज्यसभेसाठी आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रि.पा.इं. नेते रामसाद आठवले यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या कोट्यातील सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणुक होणार आहे. भाजपकडून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर#hellomaharashtra @Chh_Udayanraje @RamdasAthawale @BJP4Maharashtra pic.twitter.com/eYaxTuTKJa — Hello Maharashtra … Read more