Wednesday, February 1, 2023

वैष्णोदेवीची यात्रा आजपासून बंद; इतिहासात पहिल्यांदाच घेतला निर्णय

- Advertisement -

कटरा | जगभरात कोरोनाचा थेमान सुरु असून देशात कोरोनाचे १४७ पोझिटिव्ह रुग्न सापडले आहेत. आता वैष्णोदेवी यात्रेवरही कोरोना परिणाम झाला आहे. वैष्णोदेवीची यात्रा आज पासून बंद करण्याचा निर्णय जम्मू काश्मिर सरकारने घेतला आहे.

इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील बससेवाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. राज्यात बाहेरुन येणाऱ्या कोणत्याही बससेवा सुरु न ठेवण्याचा मोठा निर्णय जम्मु काश्मिर सरकारने घेतला आहे.

- Advertisement -

दरम्यान वैष्णोदेवी यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी रोज २५००० हून अधिक भक्त हजर होते. नंतर तो आकडा १५००० वर घसरला तर बुधवारी सकाळी भक्तांचा आकडा फक्त ३५०० वर गेल्याने यात्रा प्रशासनाने सदर निर्णय घेतल्याचे समजत आहे.