दगडूशेठच्या सजावटीचा गौरवशाली इतिहास

Dagdusheth Ganpati with dagine

आनंदोत्सव | प्रदीप देशमुख यंदाच्या वर्षी (२०१८) साली केरळमधील श्री राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची आरास करण्यासाठी वापरली जात आहे. मागील ३ वर्षांमध्ये (२०१५, २०१६ व २०१७) सुद्धा अशाच प्रकारची सजावट पहायला मिळाली होती. काही कारणाने ती पाहता आली नसेल तर खास तुमच्यासाठी आम्ही ती उपलब्ध करुन देत आहोत. तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडीओ … Read more

दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्री राजराजेश्वर मंदिर

Dagdusheth Ganpati

आनंदोत्सव | राहुल दळवी पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीची दरवर्षी असणारी आरास ही नयनरम्य अशीच असते. यंदाच्या वर्षीही श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये दगडूशेठ हलवाई विराजमान होणार आहेत. केरळमधील कन्नूर जिल्ह्यात श्री राजराजेश्वर मंदिर आहे. केरळमधील १०८ प्राचीन शिवमंदिरांपैकी हे एक आहे. भगवान परशुरामाचे संदर्भही याठिकाणी असल्याचं आढळतात. मंदिराच्या उभारणीचा प्रवास जाणून घेऊया खास … Read more

सरकारने मोफत कौशल्याधिष्ठीत कोर्स सुरू करावेत – प्रा सुभाष वाघमारे

IMG WA

पाचवड | स्थानिक प्रतिनिधी “संयुक्त राष्ट्र संघाच्या युनेस्को समितीने २०१८ हे वर्ष” साक्षरता आणि कौशल्य विकास” या नावाने साजरे करण्याचे ठरविले असून भारत सरकारने देशातील कौशल्यपूर्ण कामगारांची संख्या वाढविण्यासाठी गरजूंना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे, आणि त्यासाठी गरजे नुसार कोर्स सुरू करावेत असे मत प्राध्यापक सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले, पाचवड येथील रयत शिक्षण संस्थेच्या … Read more

महाराष्ट्राचं आराध्य दैवत – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

Dagdusheth Halwai

यंदाच्या गणेशोत्सवाची रंजक सफर – घेऊन येतोय आपला चिन्मय साळवी – आनंदोत्सव – या विशेष सदरातून

जगणं आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं

disha pinki shaikh

विचारविश्व | दिशा पिंकी शेख तृतीयपंथी असं बोललं जाणं हेसुद्धा आमच्यावर कुणीतरी लादलेलच आहे. ती वेगळी ओळख आम्हाला दिली जाते. बऱ्याचदा तर आम्हाला पुरुष असल्याचं समजलं जातं. नाव घेताना पुरुषार्थी वचनं वापरली जातात. आम्हाला समजून घेण्यात समाज अजूनही कमी पडतो आहे. आशा आहे हे चित्र एक दिवस नक्कीच बदलेल. दिशाची मुलाखत ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक … Read more

आधी सेरेनाचा राडा, नंतर नोवाकचा विजयोत्सव

images

क्रीडानगरी | योगेश जगताप शनिवारी सायंकाळी झालेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी ओसाका हिने २३ वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विलीयम्सचा पराभव केला. मातृत्वानंतर विजेतेपद मिळवण्याचं सेरेनाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. ओसाका ही ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणारी जपानची पहिलीच खेळाडू ठरली. या सामन्यात पंच सदोष कामगिरी करतायत, ही तक्रार करुन सेरेनाने पंचांशी … Read more

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त पथनाट्य

images

सातारा | प्रतिनिधी आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाचे औचित्य साधून जकातवाडी गावामध्ये परिवर्तन संस्था आणि किमया नवजीवन प्रेरणा केंद्राच्या सदस्यांनी पथनाटय़ सादर केले. महिला व मुलांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी, माहिती पोहचावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व महिला व बालकल्याणचे अधिकारी श्री खाडे साहेब डॉ. मनिषा … Read more

विचार तर कराल..

IMG WA

विचारविश्व | घनश्याम येणगे काही गोष्टी समजून घेतल्या की जास्त सोप्या वाटतात. तर काही गोष्टी जाणीवपूर्वक समजू नयेत म्हणून षडयंत्र वापरली जातात.आपण मात्र कंटाळा करतो आणि माझा याच्याशी काय संबंध असं बोलत राहतो. जात-धर्म व दहशतीचे वातावरण अधोरेखित करणारी चित्रफीत मागे आनंद पटवर्धन यांनी केली होती. त्यावरच भाष्य करणारा त्यांचाच हात लेख – इंग्रजी माध्यमातून … Read more

उकडीचे मोदक

मोदक

खाद्यभ्रमंती | अमृता जाधव

साहित्य :
1 मोठा नारळ, किसलेला गूळ, 2 कप तांदूळाचे पिठ, वेलचीपूड, मिठ, तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप

कृती :
▪ सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा.पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि वेलची पूड घालावी.

▪ आवरणासाठी तांदूळाची उकड करण्यासाठी नेहमी जितके पिठ तितके पाणी असे प्रमाण घ्यावे. 2 कप तांदूळ पिठासाठी 2 कप पाणी गरजेचे असते. जाड पातेल्यात 2 कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात 1 चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे. गॅस बारीक करून पिठ घालावे, ढवळावे. मध्यम आचेवर 2-2 मिनीटे 2-3 वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढावी. गॅसवरून उतरवून 5 मिनीटे झाकून ठेवावे.

▪ परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी लागते. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.

▪ उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.

▪ मोदकांना वाफवण्यासाठी चाळणीपेक्षा मोठ्या तोंडाचे जाड बुडाचे पातेले घ्यावे. त्यात 3-4 भांडी पाणी उकळावे. चाळणीत स्वच्छ सुती कापड ठेवून त्यावर जेवढे मावतील तेवढेच मोदक ठेवावेत. पातेल्यातील पाणी उकळले कि मिडीयम हाय गॅसवर पातेल्यात कूकरचा डबा ठेवावा त्यावर मोदकांची चाळण ठेवावी. पाणी मोदकांच्या तळाला स्पर्शेल एवढे असले पाहिजे. वरून झाकण ठेवून 12-15 मिनीटे वाफ काढावी.


मोदकाची उकड झाली सोप्पी

नमस्ते दोस्तहो, मोदकाची उकड कशी सोप्पी करता येईल त्यावर महिनाभर प्रयोग करत होतो. आता सर्वाना सहज करता येईल अशी उकडीची पध्दत सापडली. नक्कीच करुन पहा

१. पाव कीलो मोदकाच पिठ घेवून त्यात चवीपुरते मिठ व १ चमचा तूप घालून ते साध्या पाण्याने भाकरी सारख सॉफ्ट मळून घ्यायचे

२. कुकरची शिट्टी काढून अळुवड्या लावतो तस डब्यात हा मळलेला गोळा ठेवून कुकरमधून वाफ यायला लागल्यावर ६ ते ७ मिऩिटांनी गँस बंद करावा

३. वाफवलेला गोळा परातीत घेवून साध्या पाण्याने पुन्हा सॉफ्ट मळून घ्यायचा व त्याचे मोदक बनवावेत हवे तसे मोदक बनवता येतात लाती न फाटता
मोदक तयार झाल्यावर नेहमीप्रमाणे कुकरची शिट्टी काढून वाफवून घ्यायचे
मोदकाचे सारण
सारणासाठी मोठ्या नारळाची १ कवड ,२००ग्रँम गुळ, १ चमचा तूप, १चमचा वेलची पावडर

क्रिमरोल

images

जावे कवितांच्या गावा | नितीन चंदनशिवे

क्रिमरोल वर सुद्धा कविता होते आणि लिहिता लिहिता रडवून जाते.आपणाला ही नक्कीच भावेल ही कविता.
आणि तसंही प्रत्येकाच्या संघर्षाची कथा या क्रिमरोल शिवाय कधीच पूर्ण होणार नाही.आपली प्रतिक्रिया महत्वाची आहे.जरूर द्या.

—- क्रिमरोल —-

भूक
उचंबळून वर यायची
आतडी फाटायची
जीभ सुकायची
लाईफ संघर्षाच्या काळात
करिअर करिअर म्हणायची
तेव्हा,
पोटाला आधार देणारा
कटिंग चहाबरोबर
खिसा सांभाळत हातात यायचास
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

दिवसातून एकच भेट
तुझं माहीत नाही
पण मी तरसायचो तुला भेटायला
भुकेचा आणि मेंदूचा
जुगार चाललेला असताना
भूक नेहमी हारायची
तेव्हा तू द्यायचास आधार
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

तू फार आवडत होतास
असं नाही
पण तू भूक अडवत होतास
काही काळ तरी
तुला बनवणाऱ्या हाताला
मी कायम सलाम करत राहिलो
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

मराठवाड्याचा दुष्काळ
विदर्भाचे दुःख
खान्देशी,माणदेशी,
कोकणी आणि बरंच काही
फक्त तू जवळून पाहिलं
तु प्रत्येकाचा आधार झालास
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

तू हातात आलास की
नेमकं त्याचवेळी आई
फोनवर विचारायची
काही खाल्लं का रे बाळा..?
तेव्हा तुला अख्खा तोंडात
कोंबून बोबडे बोल बोलायचो आईशी
आई जेवतोय नंतर बोलतो.
खरंतर तेव्हा फार जवळचा वाटायचास मला
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

अस्लमला भेटतोस
चंदनशिवेला भेटतोस
भोसलेला भेटतोस
आणि एखाद्या जोशीलासुद्धा
पण तूच एकमेव आहेस
कुणाला नाव,गाव,जात,धर्म
न विचारता आधार देत राहतोस
माझ्या प्रिय मित्रा क्रीमरोल..

तू संपून जाणारा
एक पदार्थ असलास तरीही
तू स्टगलरांचा फार मोठा आधार आहेस
तू मला जी साथ दिलीस
नाद खुळा यार नाद खुळा
पाच रुपयात भूक मारायची
कला तुझ्यात आहे
म्हणूनच
अनेक स्टगलर कलाकारांना
तुझा फार मोठा आधार आहे
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल..

दंगलकार-नितीन चंदनशिवे
मु.पो.कवठेमहांकाळ
जि.सांगली
7020909521