Auto Expo 2023 : या’ Electric Car चा लूक पाहून तुम्हीही हीच्या प्रेमात पडाल

Auto Expo 2023 Lexus LF30
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या Auto Expo 2023 मध्ये एकामागून एक दमदार आणि आकर्षक गाड्या पाहायला मिळत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढलेली आहे. त्यामुळेच गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन निर्मात्या कंपन्या बाजारात इलेक्ट्रिक गाड्या घेऊन येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर टोयोटाच्या लक्झरी ब्रँड लेक्ससने आपली कांसेप्ट LF 30 कार ऑटो एक्स्पो मध्ये प्रदर्शित केली. ही कार बघता क्षणीच तुमच्या मनात बसेल. या कारचे दरवाजे हे एखाद्या फुलपाखरासारखे आहेत, जे वरच्या दिशेला जातात. आज आपण जाणून घेऊया या गाडीची खास वैशिष्ट्ये…

Auto Expo 2023 Lexus LF30

वैशिष्ट्ये –

Lexus LF30 कॉन्सेप्ट ही 4 सीटर कार आहे. या (Auto Expo 2023) कारचे स्टीयरिंग डाव्या बाजूला आहे. या कॉन्सेप्ट कारचे संपूर्ण छत ग्लास पॅनलचं आहे. भविष्यातील गोष्टींचा विचार करून या कारची अशी रचना करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कारचे दरवाजे वरच्या दिशेने उघडतात. त्यामुळे त्याला बटरफ्लाय स्टाईल (फुलपाखरू) दरवाजे असे सुद्धा आपण म्हणू शकता. गाडीच्या आकारमानाबाबत सांगायचं झाल्यास, या इलेक्ट्रिक कारची लांबी 5,090 मिमी, रुंदी – 1,995 मिमी आणि उंची – 1,600 मिमी आहे. Lexus LF30 ला 3,200 मिमीचा व्हीलबेस मिळतो.

Auto Expo 2023 Lexus LF30

500 किमी रेंज – Auto Expo 2023

Lexus LF30 ला 110 kW/h चा बॅटरी पॅक मिळेल. या कारच्या (Auto Expo 2023) चारही चाकांवर इलेक्ट्रिक मोटर असेल, जी बॅटरीला जोडलेली असेल. कंपनीच्या वेबसाइटनुसार एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही इलेक्ट्रिक कार तब्बल 500 किमी धावू शकते. ही कार फक्त ३.८ सेकंदात १०० किलोमीटर प्रतितास वेग वाढवू शकते. एकदम हटके लूक असणारी ही इलेक्ट्रिक कार नेमकी कधी लॉन्च होईल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. परंतु या यंदाच्या ऑटो एक्स्पो मध्ये या गाडीने सर्वांचे लक्ष्य वेधले आहे हे मात्र नक्की.