चांगले पुण्य केल्याने चांगली सून – चांगला जावई मिळतो; चंद्रकांत पाटील यांच्याकडून अंधश्रद्धेचा पुरस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । प्रफुल्ल पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील व महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना माफी मागावी लागली होती. आता त्यानंतर आता पुन्हा एकदा ते एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. “आपला कुठलाही देव बॅचलर नाही. आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाही. संसार करुन सगळे करता येते. सेवा देखील करता येते. गणपती कुणी देव नव्हता तर गणपतराव म्हणून सरपंच होते तो देव झाला, पुण्य केल्याने चांगली सून मिळते आणि मुलगी असेल तर चांगला जावई मिळतो, असे विधान पाटील यांनी केले आहे.

पुणे जिल्हा भापच्यावतीने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच,उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमार प्रमुख पाहुणे म्हणून उच्च, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी ते म्हणाले की, वास्तविक पाहता लक्षात घेतलं तर माणसाचा जन्म हा कशापासून होतो तर तो स्पर्मपासून होतो. स्पर्म दिसत देखील नाही. पण स्पर्म 100 किलोचा माणूस तयार करतो. त्यात माणूस कसा आहे हे ठरवतो. त्या स्पर्ममधून माणूस निर्माण करणारा कोणी तरी आहे ना? सगळी माणसे त्याने वेगळी बनवली आहेत. त्याच्या स्पर्ममध्ये त्याने काय व्हायचंय हे ठरवलेले असते.

…तर सगळ्यांचीच सुंता झाली असती : पाटील

“तुम्हाला मंदिरात जायला योग्य वाटतं त्या मंदिरात जा. तुम्हाला मस्जिदमध्ये नमाज पठण करायचं असेल तर ते करा. तुम्हाला आमचा विरोध नाही. हिंदू हा शब्द पूजेशी जोडला गेलेला नाही. हिंदू हा शब्द एक गुण वाचक आहे. आपल्या देशावर किती आक्रमण झाली. इंग्रज आले, डच आले, आपल्याला काय फरक पडला? आपला धर्म बुडाला का? छत्रपती संभाजी महाराज यांचे देखील हाल केले. पण त्यांनी देखील आपला धर्म सोडला नाही. त्यांच्यावर किती अत्याचार झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला धर्म वाचवला नसता तर आज सगळ्यांची सुंता झाली असती, असेही पाटील यांनी यावेळी म्हंटले.