Auto Expo 2023 : मारुती सुझुकीने आणली नवी Electric SUV; 550 किमी रेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ऑटोमोबाईल जगतातील सर्वात मोठा इव्हेंट्स असलेल्या Auto Expo 2023 ला आजपासून सुरुवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली पहिली कॉन्सेप्ट Electric SUV eVX सादर केली आहे. ही सुझुकीने डिझाइन केलेली मध्यम आकाराची इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. 2025 पर्यंत ही कार मार्केटमध्ये येईल. चला जाणून घेऊया या गाडीचे खास फीचर्स….

Auto Expo 2023 Maruti Suzuki EVX

डिझाइन

गाडीच्या आकाराबाबत (Auto Expo 2023) सांगायचं झाल्यास, या इलेक्ट्रिक SUV ची लांबी 4300मिमी , रुंदी 1800मिमी आणि उंची 1600मिमी आहे. सुजुकी मोटर कॉर्पोरेशन,जापान ने ही SUV डिझाईन केलेली आहे. यामध्ये समोरील बाजू पूर्णपणे पॅक आहे. कारमध्ये डायमंड कट मशीन अलॉय मिळतात जे खूपच ऍक्टिव्ह दिसत आहेत. याशिवाय समोरील बाजूस तळाशी सिल्व्हर स्किड प्लेटसह LED फॉग लॅम्प देखील मिळतात.

Auto Expo 2023 Maruti Suzuki EVX

 550 किमी रेंज – (Auto Expo 2023)

या इलेक्ट्रिक कारमध्ये (Auto Expo 2023) आरामदायी सुविधा आहेत. गाडीत सुरक्षित बॅटरी तंत्रज्ञान आणि एडवांस केबिन मिळते . मारुती सुझुकी eVX इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट SUV ला 60kWh चा बॅटरी पॅक मिळतो. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार तब्बल 550 किमी पर्यंत धावू शकते. मारुतीचा दावा आहे की या नवीन SUV मध्ये परफॉर्मन्ससह एडवांस्ड कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतील. कंपनीने इलेक्ट्रिक एसयूव्ही उत्पादनासाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणाही केली आहे.

हे पण वाचा :

Auto Expo 2023 :सध्याच्या ट्रेंडिंग गाड्यांचे फोटो पहिले का?

Auto Expo 2023 मध्ये Hyundai सादर करणार ही Electric कार; 614 किमी रेंज

Auto Expo 2023 मध्ये दिसणार ही जबरदस्त Electric Sedan; 700 किमी रेंज

Auto Expo 2023 : MG मोटर घेऊन येतेय Electric हॅचबॅक कार; 450 किमी रेंज