Auto Expo 2023 : देशातील पहिली Solar Electric Car! 45 मिनिटांत फुल्ल चार्ज; 250 किमी रेंज

Auto Expo 2023 Vayve EVA
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय ऑटो जगतातील सर्वात मोठा इव्हेंट असलेल्या Auto Expo 2023 मध्ये एकामागून एक दमदार वाहने सादर केली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील वायवे मोबिल्टी या ऑटो स्टार्ट-अप कंपनीने भारतातील पहिली Solar Electric Car सादर केली आहे. Vayve EVA असं या कारचे नाव असून हि कार सूर्यप्रकाशावर धावेल. पर्यावरणासाठी ही गाडी अतिशय अनुकूल असून यामधून प्रवास करताना तुमचा खर्च केवळ 80 पैसे प्रति किलोमीटर असेल कारण तिच्या सौर उर्जेच्या स्त्रोतामुळे इंधनाची गरज लागत नाही . चला जाणून घेऊया या सोलर इलेक्ट्रिक कारची काही खास वैशीष्ट्ये….

आकारमान – 

या कारच्या आकाराबद्दल बोलायचे झाले तर गाडीची लांबी 3060mm, रुंदी 1150mm आणि उंची 1590mm. या सोलर इलेक्ट्रिक कारला 170mm ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. कारच्या पुढील बाजूस स्वतंत्र कॉइल स्प्रिंग सस्पेंशन आणि (Auto Expo 2023) मागील बाजूस ड्युअल शॉक सस्पेंशन आहे. गाडीच्या पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकांना ड्रम ब्रेक मिळतात. या सोलर इलेक्ट्रिक कारला 3.9 मीटर टर्निंग रेडियस असलेले इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग मिळते.

Auto Expo 2023 Vayve EVA

वैशिष्ट्ये – Auto Expo 2023

वातावरणातील बदल पाहता ही कार लोकांना एक चांगला पर्याय देईल. या गाडीमध्ये ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सिस्टीम असून एअर कंडिशन (एसी) ची सुविधाही आहे. तसेच 6 वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि पॅनोरामिक सनरूफ देखील मिळेल. पॅनोरामिक सनरूफमुळे कारच्या आतील भाग अधिक प्रशस्त दिसतो. गाडीची साईज जरी लहान असली तरी जेव्हा तुम्ही गाडीच्या आत बसता तेव्हा तुम्हाला त्याचा लहानपणा जाणवत नाही.

Auto Expo 2023 Vayve EVA

250 किमी पर्यंत रेंज –

भारतातील या पहिल्या सोलर (Auto Expo 2023) कारमध्ये 6kW लिक्विड कूल PMSM इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 14 kWh बॅटरी पॅक पॉवर देते. ही कार फास्ट चार्जिंगसह 45 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकते. जर स्टॅंडर्ड सॉकेटद्वारे चार्ज केले गेले तर ही कार पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर तुम्ही या गाडीतून 250 किमी पर्यंत प्रवास करू शकता. याशिवाय ही कार केवळ 5 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडण्यास सक्षम आहे.

हे पण वाचा : 

Auto Expo 2023 : या Electric Car चा लूक पाहून तुम्हीही हीच्या प्रेमात पडाल

Auto Expo 2023 : मारुती सुझुकीची JIMNY नव्या अवतारात सादर; आजपासून Booking सुरु

Auto Expo 2023 : Hyundai IONIQ 5 Photos

Auto Expo 2023 : मारुती सुझुकीने आणली नवी Electric SUV; 550 किमी रेंज