नवी दिल्ली । भारतातील प्रवासी वाहनांची (Passenger vehicle) घाऊक विक्री जुलैमध्ये 45 टक्क्यांनी वाढून 2,64,442 युनिट्स झाली जी गेल्या वर्षी याच महिन्यात 1,82,779 युनिट्स होती. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM Report) च्या ताज्या आकडेवारीनुसार, दुचाकींची घाऊक विक्री जुलैमध्ये दोन टक्क्यांनी घसरून 12,53,937 युनिट्सवर आली आहे, जी एक वर्षापूर्वी 12,81,354 युनिट्स होती.
गेल्या महिन्यात मोटारसायकलींची विक्री 8,37,096 युनिट्स होती जी जुलै 2020 मध्ये 8,88,520 युनिट्स होती, म्हणजे सहा टक्क्यांनी घटली. जुलै 2020 मध्ये स्कूटरची विक्री 3,34,288 युनिट्सपेक्षा 10 टक्क्यांनी वाढून यावर्षी जुलैमध्ये 3,66,292 युनिट्स झाली.
तीन चाकी वाहनांच्या विक्रीत वाढ
तीन चाकी वाहनांची विक्री गेल्या महिन्यात 41 टक्क्यांनी वाढून 17,888 युनिट्स झाली आहे, जे एक वर्ष आधी याच महिन्यात 12,728 युनिट्स होती. व्यावसायिक वाहने वगळता सर्व श्रेणींमध्ये एकूण विक्री 15,36,269 युनिट्स होती, जी गेल्या वर्षी जुलैमध्ये 14,76,861 युनिट्स होती.
अध्यक्षने आकडेवारीही जाहीर केली
या व्यतिरिक्त, FADA च्या आकडेवारीनुसार, जुलै 2021 मध्ये विविध श्रेणींच्या वाहनांची एकूण विक्री 34.12 टक्क्यांनी वाढून 15,56,777 युनिट्स वर पोहोचली. FADA चे अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले की, नवीन लाँच आणि कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये मागणी जोरदार आहे. जुलै 2021 मध्ये मारुती सुझुकीने 1,14,294 वाहने विकली, तर ह्युंदाई मोटरने 44,737 वाहने विकली.
यानंतर टाटा मोटर्सने 24,953 वाहने विकली. महिंद्रा अँड महिंद्राने 16,326 वाहने आणि किआ मोटर्सने 15,995 वाहने विकली. जुलैमध्ये व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत वर्षानुवर्ष 165.9 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. या कालावधीत एकूण 52,130 व्यावसायिक वाहने विकली गेली. जुलै, 2020 मध्ये हा आकडा 19,602 युनिट होता.