आता WhatsApp वरही मिळणार फेसबुक-इन्स्टाग्रामचे ‘हे’ फीचर, मार्क झुकरबर्गने दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp आपल्या युझर्ससाठी नेहमीच अनेक नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. आता पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅपकडून युझर्ससाठी एक नवीन फीचर जारी करण्यात आले आहे. कंपनीचे सीईओ असलेल्या मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत माहिती देताना म्हंटले कि, व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरद्वारे युझर्सना आपला कस्टमाइज्ड डिजिटल अवतार तयार करता येईल. हे लक्षात घ्या कि, व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर फेसबुक आणि इंस्टाग्राम अ‍ॅप वापरणाऱ्यांची याआधीच उपलब्ध करण्यात आले आहे.

WhatsApp

यानंतर आता WhatsApp युझर्सना देखील आपले कस्टमाइज्ड डिजिटल अवतार टायरा करता येईल. याशिवाय, त्यांना आपले आउटफिट, हेयरस्टाइल आणि फेशिअल फीचर्सचे कॉम्बिनेशनही निवडता येतील. एका मीडिया रिपोर्टनुसार, हा नवीन व्हॉट्सअ‍ॅप अवतार आपला प्रोफाईल फोटो म्हणूनही वापरता येणार आहे.

Express Yourself With Avatars on WhatsApp | Meta

WhatsApp युझर्सना अवतार एक्शन आणि इमोशनसाठी 36 कस्टमाइज स्टिकर्समधून एक निवडण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल. हे लक्षात घ्या कि, एकदा अवतार तयार झाल्यानंतर युझर्सना तो आपले मित्र आणि कुटुंबासहीत शेअर करता येईल.

See how to use Facebook Avatar on Whatsapp. - Programmers Brazil

कंपनीने याबाबत माहिती देताना म्हटले की,” येत्या काळात लायटिंग, हेअरस्टाईल टेक्सचर, शेडिंग आणि इतर कस्टमायझेशन सारखे अनेक नवीन फंक्शनॅलिटी यामध्ये जोडले जातील. ज्यामुळे युझर्सना अ‍ॅप वापरताना आणखी मजा येईल. मात्र, कंपनी कडून हे फीचर टप्प्याटप्प्याने जारी केले जात आहे. त्यामुळे सर्वच डिव्हाइसेसवर एकाच वेळी हे फिचर उपलब्ध केले जाणार नाही. सध्या ते WhatsApp iOS आणि Android वर उपलब्ध आहे.

➤How to create your own avatar in WhatsApp ????

हे फीचर वापरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ओपन करून स्टिकर ऑप्शनवर जावे लागेल. अँड्रॉइडमध्ये यासाठी चॅटबॉक्समधील इमोजी साईनवर टॅप करावे लागेल. तर iOS मध्ये स्टिकरचा पर्याय चॅट बॉक्समध्येच आहे.

WhatsApp Avatar: What is it, and how to create your Avatar? | Business Insider India

यानंतर अवतारांच्या ऑप्शनवर जाऊन नवीन अवतार तयार करावा लागेल. यामध्ये आपली हेअर स्टाइल, फेशियल आणि इतर पर्याय कस्टमाइज करून अवतार तयार करा. जास्त रियलस्टिक अवतार तयार करण्यासाठी फ्रंट कॅमेरा देखील वापरा. तसेच अवतार तयार केल्यानंतर तो सेव्ह करा.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://faq.whatsapp.com/444337191136954

हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ दोन बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 9% पेक्षा जास्त व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर
IDBI Bank मध्ये हिस्सेदारीसाठी ‘या’ 3 कंपन्यांनी दाखविला रस, शेअर्सने गाठली 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी
Renault India : नवीन वर्षात वाढणार गाड्यांची किंमत; Car Loan ही होणार महाग
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका