हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ईडीने दणका दिला आहे. अविनाश भोसले यांची यांच्याी 4 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी ईडीने अविनाश भोसलेंना समन्स बजावले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी सुरु होती. आता ईडीने त्यांची 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
पुण्यातील सरकारी जागेवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं होतं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही जमीन पुण्यातील गणेशखिंड रोडवरील रेंज हिल कॉर्नरमधील प्लॉन नंबर २, यशवंत घाडगे नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेत स्थित आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.
अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, ईडीने भोसले यांच्या गणेशखिंड रस्त्यावरील कार्यालयातही काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती.