हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजपर्यंत आपण फोन चार्जिंगला लावलेला असताना त्याचा स्फोट झाल्याचा किंवा जाळ झाल्याच्या अनेक घटना ऐकलेल्या आहेत. अशातच आता चीनमधून एक भयंकर घटना समोर येत आहे. ती म्हणजे एका महिलेने सांगितले आहे की, रात्रभर तिने मोबाईल चार्ज करायला लावलेला होता. त्यावेळीच आयफोन 14 प्रो मॅक्स अचानक बॉम्ब सारखा फुटला. आणि तिच्या हाताला देखील गंभीर दुखापत झालेली आहे. आजकाल स्मार्टफोनच्या कंपन्या त्यांच्या सेफ्टी फीचर्स बद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. परंतु प्रत्यक्षात तशा कोणत्याही सेफ्टी नसल्याचे पाहायला मिळते. परंतु आता हा स्फोट नक्की कसा होतो? हा स्पॉट लागू नये, यासाठी कोणत्या चुका करू नयेत. म्हणून हे आज आपण जाणून घेणार आहोत.
ओव्हर चार्जिंगमुळे स्फोट होतो
चीनमधील या महिलेने रात्रभर फोन चार्जिंगला ठेवला असल्याने ही घटना घडलेली आहे. सकाळी उठल्यावर तिचा फोन पेटलेला दिसला. तसेच तिच्या ब्लांकेटला आणि खोलीच्या काही भागांना देखील आग लागली, असून त्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. झोपेत त्या महिलेचा हात चुकून त्या आगीला लागला. त्यावेळी तिच्या हाताला आणि मागील भागाला देखील भाजलेले आहे.
त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे लोक देखील गेले होते. त्या स्फोटमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या घटनेचे व्हिडिओ फुटेज देखील समोर आलेले आहे. या फोटोमध्ये महिलेचे ब्लॅंकेट जळलेले आहेत. तसेच भिंत देखील धुराने काळी झालेली आहे. ही आग अत्यंत भयंकर होती. त्यामुळे नुकसान देखील झालेले आहे. या महिलेने हा आयफोन २०२२ मध्ये खरेदी केला होता. आणि त्याची गॅरंटी देखील संपली होती.
कोणत्या चुका टाळाव्या
इतर कोणत्याही चार्जरचा वापर करू नये
आपल्या स्मार्टफोनला चार्जिंग करताना मोबाईलच्या चार्जर चार्जिंग करावी. जर इतर चार्जर चार्जिंग केली, तर त्यामुळे मोबाईल डॅमेज होऊ शकतो आणि आपला फोन देखील फुटू शकतो.
चार्जिंग करताना मोबाईल वापरू नये
अनेक लोक हे आजकाल चार्जिंग करताना मोबाईल फोन वापरत असतात परंतु चार्जिंग करताना मोबाईल फोन वापरणे चुकीचे असते. चार्जिंग चालू असताना मोबाईलच्या इंटर्नल सिस्टीम चालू असतात. त्यामुळे मोबाईलचे स्पोट होण्याची शक्यता होते.
चार्जिंग करताना कव्हर वापरणे
अनेक लोक मोबाईल चार्जिंग करताना कव्हर सोबतच मोबाईल चार्जिंगला लावतात. परंतु कव्हरसोबत जर मोबाईल चार्जिंगला लावला, तर त्यामुळे देखील मोठे नुकसान होऊ शकते.
मोबाईल रात्रभर चार्जिंगला ठेवू नका
अनेक लोक हे मोबाईल रात्रभर चार्जिंगला ठेवतात. परंतु असे अजिबात करू नये. फोनचा ब्लास्ट होण्याचे हे एक मोठे कारण आहे. तुमची जर चार्जिंग प्रमाणापेक्षा जास्त झाली, तरी देखील मोबाईलच स्फोट होऊ शकतो.