सवादे येथील शंकर चव्हाण यांना राज्यपालाच्या हस्ते पुरस्कार प्रदान

कराड | महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने आरोग्य सेवेसाठी देण्यात येणारा पुरस्कार सवादे (ता.कराड) येथील शंकर चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

मुंबई येथे राजभवनात हा कार्यक्रम झाला. शंकर चव्हाण यांनी कोरोना काळात आपल्या ऐरोली येथील इंद्रावती हॉस्पिटलच्या माध्यमातून शेकडो लोकांना मदत केली. त्यानी केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही शंकर चव्हाण यांच्या कार्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला.

यावेळी ठाणेचे आमदार संजय केळकर, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे, उपजिल्हाधिकारी डॉ. पदसिंह बैनाडे, मनोज परब, सौ. शुंभागी चव्हाण उपस्थित होते.