आमदारांचे निलंबन रद्द होताच आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारने निलंबित केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकार वर कडाडून टीका करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा ऐतिहासिक फैसला असून लोकशाहीतला अंजन टाकणारा निर्णय असल्याचं आशीष शेलार यांनी म्हटलंय.

ठाकरे सरकारने अहंकारामुळे शहाणपण गमावलेलं आहे. आज महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या ऐतिहासिक निर्णयात एका पार्श्वभूमी असलेल्या विधीमंडळाला, सरकारला आणि महाराष्ट्राला या ठाकरे सरकारच्या तर्कहीन, अवैध आणि असैविधानिक अशा ठरावामुळे इजा पोहोचलेली आहे. ही इजा आणि अवास्तव महाराष्ट्रामध्ये होणारी चर्चा देशात रोखता आली असती. परंतु ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च कोटीला गेलेला आहे. आम्हाला कुठल्याही व्यवस्था मान्य नाहीत.

आशिष शेलार म्हणाले, कोर्टानं दिलेल्या ऑपरेटीव्ह ऑर्डरमध्ये कोर्टानं स्पष्ट केलंय जो ठाकरे सरकारनं निलंबनाचा निर्णय केला होता, तो घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि तर्कहीन आहे, असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय. त्याहून गंभीर बाब म्हणजे तुम्ही जो केलेला ठराव आणि निर्णय आहे, हा लोकशाहीला धोका आहे, असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं.