एसटी चालकावर कुऱ्हाडीने वार, बसवर दगडफेक

0
160
ST Bus Attack
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी|शुभम बोडके
सातारहून परळी खोऱ्यातील रायघर (कारी) कडे येणाऱ्या एसटी चालकावर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अज्ञातांनी कुऱ्हाडीने वार केले. एस.टीच्या काचा फोडण्याचा धक्कादायक प्रकारही घडला. या घटनेची रात्री उशीरा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून सदरचा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.

चालक पद्माकर शेलार हे सातारहून कारी रायघरकडे एस. टी. घेवून निघाले होते. बोगद्याच्या बाहेर एका हॉटेलनजीक दोघेजण दुचाकी रस्त्यावरच लावून उभे होते. यावेळी चालकाने आवाज देऊनही त्यांनी गाडी बाजूला न घेतल्याने चालक पदमाकर शेलार हे खाली उतरले व त्यांनी रस्त्यात उभे केलेले वाहन बाजूला घेण्यास सांगितले.

यावेळी दोन इसमांबरोबर चालक व वाहकाचा वाद झाला. वाद वाढत गेल्याने त्यातील एकजण कुन्हाड घेऊन आला अन् पद्माकर शेलार यांच्या पायावर वार केला. तसेच एस.टीची काच फोडली. दगडफेक करुन मारहाण केली. यानंतर या दोघांनीही घटनास्थळावरुन पोबारा केला.