Axis Bank कडून ग्राहकांना दिवाळी भेट, FD वरील व्याजदरात केली पुन्हा वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील Axis Bank कडून आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या ठराविक फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात 75 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्यात आली आली आहे. 14 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. या आधीही बँकेने 1 ऑक्टोबर 2022 रोजी एफडी वरील व्याज दर वाढवले ​​होते.

AXIS BANK - Nikhil Bhatt

आता Axis Bank च्या 7 दिवस ते 29 दिवस आणि 30 दिवस ते 60 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर अनुक्रमे 2.75 टक्क्यांवरून वाढवून 3.50 टक्के आणि 3.25 टक्क्यांवरून वाढवून 3.50 टक्के करण्यात आले ​​आहेत. तसेच 61 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर 3.25 टक्क्यांवरून 4 टक्के झाला आहे.

या कालावधीचे व्याजदर पहा

आता 3 ते 6 महिन्यांच्या FD वरील व्याजदर 3.75 टक्‍क्‍यांवरून 4.25 टक्के करण्यात आला आहे. यानंतर आता Axis Bank 6 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5 टक्के, 1 वर्ष ते 15 महिने कालावधीच्या FD वर 6.10 टक्के तसेच 15 महिन्यांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.15 टक्के देत राहील.

Axis Bank numbers disappoint Street

या दर वाढीनंतर, आता Axis Bank कडून 2 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीच्या FD वर 6.20 टक्के आणि 3 वर्ष 25 दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.10 टक्के व्याजदर दिला जाईल. अ‍ॅक्सिस बँकेतील NRE आणि FCNR डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे.

Find Out Why Rs 5 Lakh Penalty Was Imposed On Axis Bank By SEBI – Trak.in – Indian Business of Tech, Mobile & Startups

ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याजदर तपासा

आता Axis Bank कडून विशिष्ट कालावधीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या एफडीवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. आता बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी ज्येष्ठ नागरिकांना 3.5 टक्के ते 6.90 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळेल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/interest-rate-on-deposits

हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून 184 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!
WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त