Ayodhya Masjid : राम मंदिरानंतर अयोध्येत मशीद उभारण्यात येणार; लवकरच बांधकामाला सुरुवात होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जानेवारीमध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या उदघाटनासाठी (Ram Mandir Ayodhya) सर्वच भारतीय उत्सुक आहेत. अनेक वर्षाचे स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यात येणार असल्याने संपूर्ण देशभरात रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येतील राम मंदिराची सर्वत्र चर्चा असताना आता या मंदिरानंतर अयोध्येत मशीद (Ayodhya Masjid) सुद्धा बांधण्यात येणार आहे. ही मशीद नेमकी कशी असेल? तिची रचना कशी असेल? याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊयात.

धन्नीपूर येथे बांधली जाणार मशीद- Ayodhya Masjid

आयोध्येतील राम मंदिर आता अंतिम टप्प्यात आले असताना रामजन्मभूमी प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अयोध्येतील धन्नीपूर येथील येथे मशीद बांधली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुस्लिमांना दिलेल्या जमिनीवर मशीद बांधली (Ayodhya Masjid) जाणार आहे. या मशीदीचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे. या बांधकामची जबाबदारी ही मुंबईतील प्रभारी संघाकडे देण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख यांची मशिदीच्या बांधकाम समितीचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जफर फारुकी हे ‘इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्ट’चे मुख्य विश्वस्त आणि उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवीन वर्षात मे महिन्यात या बांधकामास सुरुवात होणार आहे. सरकारने दिलेल्या जमिनीवर मशिदीसोबतच हॉस्पिटल, लायब्ररी, कम्युनिटी किचन आणि म्युझियम बांधले जाणार आहे.

मशीदीचे नाव ‘मोहम्मद बिन अब्दुल्ला अयोध्या मशीद’ ठेवण्यात आले

अयोध्येत मशिदीचे (Ayodhya Masjid) बांधकाम करण्यासाठी मशीद विकास समिती निर्माण करण्यात आली आहे. त्यासाठी अध्यक्षपदी हाजी अराफत शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे बांधकाम गांभीर्याने व्हावे यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या या मशिदीला ‘मोहम्मद बिन अब्दुल्ला अयोध्या मशीद’ (Mohammed Bin Abdullah Masjid) असे नाव ठेवण्यात आले आहे. हि बांधली जाणारी नवी मशीद बाबरी मशिदीच्या जागी बांधण्यात येणार असून ती 15 हजार चौरस फुटांऐवजी सुमारे 40 हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधली जाणार आहे.