Ayurvedic Herbs Prevent Hormonal Imbalance | शरीरातील हार्मोनल असंतुलनासाठी ‘या’ औषधी वनस्पतींचा करा वापर, चुटकीसरशी होईल फायदा

Ayurvedic Herbs Prevent Hormonal Imbalance
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ayurvedic Herbs Prevent Hormonal Imbalance | आजकाल लोकांची जीवनशैली खूप झपाट्याने बदलत चाललेली आहे. महिलांच्या आरोग्यावर या सगळ्या गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. कामाची धावपळया सगळ्या गोष्टींनी त्यांचे हार्मोनल इम्बॅलन्स (Ayurvedic Herbs Prevent Hormonal Imbalance) होत आहे. यामुळेच अनेक महिला त्रस्त आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. यामध्ये त्यांना मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, मूड बदलणे कामात सरच नसणे, चिंता, तणाव, नैराश्य, थकवा पचनाच्या समस्या, केस गळणे, केस अकाली पांढरे होणे यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर या सगळ्या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो

या सगळ्यावर उपाय म्हणून अनेक महिला या डॉक्टरांचे उपचार देखील घेतात. परंतु अनेकवेळा उपचार घेऊन देखील ही त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. परंतु जर तुम्ही औषधांव्यतिरिक्त आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेतले, तर तुमचे हार्मोनल संतुलित होऊन होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. या नैसर्गिक उपायांपासून तुम्ही सर्व समस्यांवर आराम मिळू शकता. आता आपण अशा काही औषधी वनस्पतीबद्दल (Ayurvedic Herbs Prevent Hormonal Imbalance) माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे महिलांमध्ये हार्मोनल संतुलन होण्यासाठी फायदे होतील.

अश्वगंधा

अश्वगंधा ही आयुर्वेदिक उपचारांमध्ये खूप पूर्वीपासून वापरली जाणारी वनस्पती आहे. रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ही वनस्पती खूप फायद्याची आहे. अश्वगंधाची पावडर किंवा चहाच्या स्वरूपात तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे तणाव कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे चांगली झोप येण्यासाठी देखील अश्वगंधाचा चांगला फायदा होतो. त्याचप्रमाणे अश्वगंधा इन्सुलिनची पातळी नियंत्रित करते आणि हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी देखील मदत करते.

मार्जोरम

या वनस्पतीचा आयुर्वेदात खूप आधीपासूनच वापर केला जातो. ही वनस्पती आपले तणाव कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये पीसीओएस नियंत्रित करण्यासाठी देखील मदत करते.

चेस्टरबरी

ही वनस्पती तुम्हाला बाजारांमध्ये कॅप्सूल किंवा अर्कच्या स्वरूपात उपलब्ध मिळेल. महिलांना होणाऱ्या अनेक समस्यापासून मदत मिळण्यासाठी ही वनस्पती खूप फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये होणाऱ्या प्रजनन आरोग्याच्या समस्यांपासूनही तुम्हाला आराम मिळतो.

शतावरी | Ayurvedic Herbs Prevent Hormonal Imbalance

स्त्रियांमध्ये पुनरत्पादन समस्यासाठी ही शतावरी खूप गरजेचे असते. शतावरी एस्ट्रोजन पातळी राखण्यास मदत करते. या शतावरीमुळे किंवा प्रजनन क्षमता सुधारत नाही तर मासिक चक्र देखील चांगले होते.

गोक्षुरा

गोक्षुरा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. बहुतेक पुरुषांमध्ये हार्मोनल असंतुलन सामान्य करण्यासाठी वापरली जाते. त्याचप्रमाणे लैंगिक समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आणि स्नायू आणि ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी या गोक्षुराचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो.