Weather Update | सावधान ! पुढील 4 दिवसात विजांच्या कडकडासह होणार मुसळधार पाऊस, IMD चा रिपोर्ट समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | नुकतेच संपूर्ण देशात उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. परंतु देशातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. या अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या उन्हाळ्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसत आहे. अशातच आता पुन्हा एकदा पुढील काही दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने (Weather Update) वर्तवलेली आहे. त्यांनी आधीच शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलेला आहे.

या राज्यांमध्ये होणार पाऊस

भारतीय हवामान विभागाने दिलेले माहितीनुसार 29 मार्चपर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये गर्जनेसह विजांच्या कडकडासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. यानंतर देशातील अनेक भागांमध्ये हवामान देखील बदलणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे.

IMD रिपोर्टनुसार मेघालय, आसाम, मनिपुर, नागालँड, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम यांमध्ये 30 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेश, आसाम मेघालयमध्ये देखील मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच पश्चिम बंगालमध्ये 31 मार्चपर्यंत हलका पाऊस पडण्याचा इशारा देखील हवामान विभागाने सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे झारखंड, ओडीसामध्ये देखील 30 आणि 31 मार्च रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. या सगळ्या हवामानाचा परिणाम राजस्थानच्या हवामानावर देखील होऊ शकतो.

त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात पश्चिम हिमालय प्रदेशातील हवामानावर देखील याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी देखील हलका पाऊस आणि हिमवर्षाव देखील होऊ शकतो.

मार्चच्या शेवटी होणार पर्वतांमध्ये हिमवृष्टी | Weather Update

मार्च महिना सुरू झालेला आहे तरी, देखील अनेक ठिकाणी हिमवृष्टी (Weather Update) सुरू आहे. अनेक ठिकाणी दोन फुटांपर्यंत बर्फ देखील साचलेला आहे.काही भागात हलकासा रिमझिम पाऊस झाला आहे त्यामुळे तापमानात फारसा फरक पडलेला नाही. परंतु आता येत्या काही दिवसांमध्ये राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलेला आहे.