इंग्लंड दौऱ्यासाठी म्हात्रे- वैभव सूर्यवंशीची निवड; BCCI ची मोठी घोषणा

AYUSH MHATRE VAIBHAV SURYVANSHI
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आयपीएल 2025 मध्ये आपल्या चमकदार कामगिरीमुळे संपूर्ण देशाचे लक्ष्य वेधून घेणारे आयुष्य म्हात्रे (Ayush Mhatre) आणि वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याना टीम इंडियात एंट्री मिळाली आहे. इंग्लंड विरुद्धच्या आगामी दौऱ्यात दोन्ही खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड (BCCI) ने याबाबत घोषणा केली आहे. आयपीएल संपल्यानंतर अंडर 19 टीम इंडिया विरुद्ध अंडर 19 टीम इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर 2 कसोटी सामने होणार आहेत. त्यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. महत्वाची बाबा म्हणजे मुंबईकर आयुष्य म्हात्रेला कर्णधार बनवण्यात आलं आहे.

अंडर 19 टीम इंडिया विरुद्ध अंडर 19 टीम इंग्लंड यांच्यातील मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया 24 जूनपासून प्रॅक्टीस मॅच (वनडे) खेळणार आहे. त्यानंतर 27 जूनपासून एकदिवलीय मालिकेला सुरुवात होईल. तर 7 जुलै रोजी पाचवा आणि अंतिम एकदिवसीय सामना पार पडेल. त्यानंतर 2 सामन्यांच्या मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होईल. हे सामने 4 दिवसांचे असणार आहेत. पहिला सामना 12 ते 15 जुलै दरम्यान होईल. तर दुसरा आणि शेलवटचा सामना 20 ते 23 जुलै दरम्यान होणार आहे. या मालिकेसाठी मराठमोळ्या आयुष म्हात्रेकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. मुंबईचा यष्टीरक्षक-फलंदाज अभिज्ञान कुंडूला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. केरळचा लेग-स्पिनर मोहम्मद अन्नान, आणि पंजाबचा ऑफस्पिनर अनमोलजीत सिंग यालाही संघात स्थान मिळाले आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे अंडर 19 भारतीय संघ –

भारत अंडर 19 संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंग चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, मोहम्मद पटेल, युवराज पटेल, युवराज पटेल, खिलन पटेल, युवराज हेन. एनान, आदित्य राणा, अनमोलजीत सिंग.

स्टँडबाय खेळाडू: नमन पुष्पक, डी दिपेश, वेदांत त्रिवेदी, विकास तिवारी, अलंकृत रापोल (यष्टीरक्षक) एपीए यूएनजी