Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ayushman Bharat Yojana : देशातील गरीब जनतेला मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. अशीच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना देखील आहे. याआधी या योजनेचे नाव आयुष्मान भारत योजना असे होते. 2018 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा आतापर्यंत 4 कोटींहून जास्त लोकांनी लाभ घेतला आहे.

हे लक्षात घ्या कि, या योजनेंतर्गत (Ayushman Bharat Yojana) लाभार्थ्याला कोणत्याही रुग्णालयातून पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतील. मात्र, देशातील प्रत्येकाला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. कारण या योजनेचा लाभ फक्त देशातील गरीब घटकांनाच दिला जातो आहे.

आयुष्मान भारत : यहाँ जानें 5 बड़े लाभ और जरूरी बातें | Ayushman Bharat know  5 big benefits and important things here - Hindi Goodreturns

आयुष्मान कार्ड

या योजनेंतर्गत (Ayushman Bharat Yojana) लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून आयुष्मान भारत गोल्डन कार्ड देण्यात येते. ज्याद्वारे लाभार्थ्यांना कोणत्याही रुग्णालयात जाऊन पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेता येतील. या योजनेसाथ ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमातून अर्ज करता येईल. तसेच आयुष्मान भारतच्या वेबसाइटला भेट देऊन यासाठीची पात्रता तपासता येईल.

Ayushman Card: क्या आपको मिल सकता है आयुष्मान कार्ड का लाभ, अभी देखें  पात्रता और दस्तावेज से जुड़ी सभी जानकारी - Ayushman card eligibilty  criteria required documents for ...

कोणा-कोणाला अर्ज करता येईल ???

हे लक्षात घ्या कि, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही भारतीय नागरिकाला आयुष्मान भारतसाठी अर्ज करता येईल. मात्र यासाठी आपल्याकडे बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे. यासोबत आपले नाव SECC-11 मध्येही असले पाहिजे.

आयुष्मान भारत योजना 2022: Ayushman Bharat Yojana ऑनलाइन आवेदन, पात्रता

आयुष्मान कार्डसाठीची पात्रता कशी तपासावी ??? 

आयुष्मान कार्ड मिळविण्यासाठी, सर्वांत आधी अधिकृत वेबसाइट http://pmjay.gov.in/ वर जावे लागेल.
यानंतर ‘am i eligible’ वर क्लिक करा.
नंतर मोबाईल नंबरसह कॅप्चा एंटर करा.
यानंतर मोबाईलवर OTP येईल. तो एंटर करा.
त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
इथे दोन पर्याय असतील. पहिल्या क्रमांकावर रेशनकार्ड आणि दुसऱ्या क्रमांकावर मोबाइल क्रमांक आणि रेशनकार्ड क्रमांक टाकून सर्च करा .
मग आपली पात्रता कळेल.
याशिवाय, जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्राला भेट देऊनही पात्रता तपासता येऊ शकेल. Ayushman Bharat Yojana

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://mera.pmjay.gov.in/search/login

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Train Cancelled : रेल्वेकडून 291 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Vivo T1 44W : फक्त 2,250 रुपयांमध्ये घरी आणा Vivo चा ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स