HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये HDFC चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत HDFC ने आपल्या होम लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये बदल केला आहे. HDFC ने आता आपल्या RLPR मध्ये 0.35 टक्के वाढ केली आहे. हे नवीन दर आजपासून म्हणजेच 20 डिसेंबर 2022 लागू होणार आहेत. होम लोनवरील व्याजदरात वाढ झाल्यामुळे आता ग्राहकांच्या कर्जाच्या मंथली ईएमआयमध्येही वाढ होणार आहे.

HDFC hikes retail prime lending rate on housing loans by 50 bps | Mint

RLPR हे अ‍ॅडजस्टेबल रेट होम लोन (ARHL) साठीचा बेंचमार्क आहे. एचडीएफसीच्या वेबसाइट वरील माहितीनुसार, एडजस्टेबल रेट होम लोनला फ्लोटिंग किंवा व्हेरिएबल रेट लोन असेही म्हंटले जाते. ARHL मधील व्याजदर हे HDFC च्या RPLR शी जोडलेले आहेत.

HDFC कमी व्याजावर देत आहे होम लोन

मे 2022 पासून HDFC कडून कर्जावरील व्याजदरात 225 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. HDFC चा दावा आहे की,” ते अजूनही बाजारात सर्वात कमी व्याजदरावर होम लोन देत आहे. भारतातील सर्वात मोठे होम लोन पुरवठादार असलेल्या SBI चा किमान होम लोन रेट 8.75 टक्के आहे. SBI कडून 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना या दराने होम लोन दिले जाते .

हा व्याज दर SBI च्या फेस्टिव्हल ऑफरचा एक भाग आहे जी 31 जानेवारी 2023 पर्यंत सुरु असेल. यामध्ये 800 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी बँकेचा सामान्य दर 8.90 टक्के आहे. त्याचप्रमाणे, ICICI बँकेच्या फेस्टिव्हल ऑफरचा दर 8.75 टक्क्यांपासून सुरू होतो. 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांसाठी देखील हे उपलब्ध आहे. बँकेचा सर्वसाधारण दर 8.95 टक्क्यांपासून सुरू होतो.

HDFC Home Loan: Get Ready To Pay Higher EMIs As HDFC Raises Lending Rates  By 20 BPS

चांगला क्रेडिट स्कोअर आवश्यक

कोणत्याही व्यक्तीला क्रेडिट कार्ड किंवा कर्ज देताना बँका किंवा कर्ज देणाऱ्या संस्था क्रेडिट स्कोअरला खूप महत्त्व देतात. जर एखाद्याचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तो कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतो. याशिवाय तो त्याच्या आवडत्या क्रेडिट कार्डसाठीही अर्ज करू शकतो.

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

RBI ने रेपो दरात केली वाढ

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfc.com/housing-loans/home-loan-interest-rates

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे