हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपुर्ण देशभरात रविवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीचा पहिलाच दिवस राजकिय नेत्यांपासून ते अभिनेत्यापर्यंत सर्वांनीन उत्साहात साजरी केल्याचे पाहिला मिळाले आहे. कारण की, गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘केसरिया गरबा’ कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली. तसेच, जामनगरमध्ये नवरात्रीनिमित्त अभिनेता आयुष्मान खुराना याने गरबा सादर केला. तसेच अनेक ठिकाणी गरबा कार्यक्रमांमध्ये वेगवेगळया कलाकारांनी उपस्थिती दर्शवली.
कालपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी अमित शहा यांनी गुजरातमधील गांधीनगर येथे सहाय फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘केसरिया गरबा’ कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच, ‘युवा मंडळ स्ट्रीट गरबा’ कार्यक्रमात देखील अमित शहा यांनी सहभाग घेतला. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी अमित शहा यांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. तसेच सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. इतकेच नव्हे तर, काल अभिनेता आयुष्मान खुरानानेही जामनगरमध्ये नवरात्रीनिमित्त गरबा सादर केला. यावेळी तो आपल्या चाहत्यांना भेटला आणि त्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
#WATCH | Gujarat: Actor Ayushmann Khurrana performs Garba on the occasion of #Navratri, in Jamnagar pic.twitter.com/vma92LIDSv
— ANI (@ANI) October 15, 2023
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल देखील यांनी नवरात्री निमित्ताने लखनौ येथील राजभवनात गरबा महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी त्या म्हणाल्या, मी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते. याठिकाणी विद्यार्थ्यांसह 2 हजारहून अधिक लोक गरबा खेळत आहेत. याचा मला आनंद आहे. मी लोकांना आवाहन करते की त्यांनी या गरबा महोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे.
नरेंद्र मोदी लिखित म्युझिक सॉंग रिलीज
मुख्य म्हणजे, नवरात्रीच्या एक दिवस अगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले गरबा म्युझिक सॉंग रिलीज झाले आहे. या गरबा सॉंगला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. सध्या सुरू असलेल्या गरबा कार्यक्रमांमध्ये नरेंद्र मोदी यांचे ‘garbo’ साँग वाजवले जात आहे.