हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरू बाबा रामदेव राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पन्नोनियो मधील ताला गावात ब्रह्मलिन तपस्वी संत धर्मपुरी महाराज यांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माविषयी वादग्रस्त विधान केले आहे. “इस्लाम म्हणजे नमाज अदा करणे आणि, जिहादी बनणे, हिंदू मुलींना उचलून नेणे, हे सर्व नमाज अदा केल्यानंतर शक्य आहे,” असे रामदेव बाबांनी म्हंटले आहे.
कार्यक्रमात बाबा रामदेव म्हणाले की, मुस्लिमांनी फक्त नमाज अदा करणे आवश्यक आहे. नमाज अदा केल्यानंतर काहीही करा, सर्व काही माफ आहे. त्यांच्यासाठी जन्नत म्हणजे घोट्याच्या वर पायजमा घालणे, मिशा कापणे, टोपी घालणे. हे मी म्हणत नाही, पण ते हेच करत आहेत. असा स्वर्ग नरकाहून वाईट आहे. हा वेडेपणा आहे.
ख्रिश्चन धर्मावर बाबा रामदेव म्हणाले की, दिवसा चर्चमध्ये मेणबत्ती लावल्याने सर्व पापे धुतली जातात. हिंदू धर्मात असे केले जात नाही. ते म्हणाले, मी कोणावरही टीका करत नाही, पण हे लोक असेच आहेत. काही जण संपूर्ण जगाला इस्लाममध्ये धर्मांतरित करत आहेत तर काहींना ते ख्रिश्चनमध्ये धर्मांतर करत आहेत.
बाबा रामदेव यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; म्हणाले की, नमाज पडा अन् हिंदू मुलींना…, pic.twitter.com/wxjC82vAcM
— santosh gurav (@santosh29590931) February 3, 2023
रामदेवबाबा यांनी या अगोदर ठाण्यातील एका योग कार्यक्रमामध्ये साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता त्यांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माविषयी वादग्रस्त विधान केले आहे.