परभणी प्रतिनिधी | जमावबंदीचे आदेश लागू असताना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येत नमाज पठण केल्याप्रकरणी विधानपरिषदेचे सदस्य असणारे राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यावर आज पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तालुका आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास जिल्हाधिकारी यांनी मज्जाव केलेला आहे. दरम्यान आज मुस्लिम बांधवांचा ईद-उल-फित्र हा सण होता .जिल्ह्यात अत्यंत साध्या पद्धतीने आज हा सण साजरा करण्यात आला. पाथरी शहरा मध्येही ईदगाह मैदानावर नमाज न पठण करता घरोघरी नमाज पठण करण्यात आली.
परंतु राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी त्यांच्या घरासमोर सोशल डिस्टन्स ठेवत पठण केलेल्या नमाज प्रकरणी त्यांच्यावर संचारबंदी चे उल्लंघन केल्याप्रकरणी आज गुन्हे दाखल झाले आहेत. यावेळी इतर १२५ लोकांवर हे गुन्हे दाखल झाले असून आता या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.