बाबर- रिजवानची फजिती; ‘या’ लीगमध्ये कोणत्याच संघाने खरेदी केलं नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या द हंड्रेड लीगच्या तिसऱ्या सिजनमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे 2 दिग्गज खेळाडू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंची चांगलीच बेइज्जती झाली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रौफ यांना मात्र द हंड्रेड लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे दोन्ही खेळाडू सध्याच्या पाकिस्तानच्या संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान सुपर लीग मध्ये या दोन्ही खेळाडूंनी खोऱ्याने धावा काढल्या होत्या. मोहम्मद रिझवानच्या नावावर पीएसएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे, तर बाबर आझम या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तरीही या दोन्ही खेळाडूंना द हंड्रेड लीगमध्ये कोणीही खरेदीदार न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बाबर आणि रिजवान दोघेही संपूर्ण हंगामात उपलब्ध नव्हते, त्यामुळे कोणत्याही संघाने त्यांच्यात रस दाखवला नाही असं सांगितलं जातंय तसेच दुसरं एक महत्त्वाचे कारण म्हणजे दोन्ही फलंदाजांचा स्ट्राईक रेट.. बाबर आणि रिझवान खोऱ्याने धावा काढत असले आक्रमकतेच्या बाबतीत इतर खेळाडूंच्या तुलनेत कमी पडतात म्हणून सुद्धा त्यांना सर्व संघ मालकांनी नाकारलं असेल. मात्र खरं कारण काय ते त्यानाच माहित, परंतु या घटनेमुळे पाकिस्तान क्रिकेटची मात्र नाच्चकी झाली हे नक्की..