Tuesday, June 6, 2023

फलंदाजही धोनी आणि गोलंदाजही धोनीच; CSK ने शेअर केला खास Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा मानल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2023 ला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व संघानी तयारीला सुरुवात केली आहे. काही खेळाडू अजूनही आंतरराष्ट्रीय सामन्यात व्यस्त असले तरी काहींनी सरावाला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची क्रिकेट मालिका नुकतीच संपली असल्याने खेळाडू सध्या आराम करत आहेत. मात्र दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीने मात्र जोरदार तयारी सुरु केली आहे.

चेन्नई सुपर किंग्सने धोनीचा सरावादरम्यानचा एक विडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये धोनी एकाच वेळी फलंदाजी आणि गोलंदाजी करत असल्याचे दिसत आहे. हा विडिओ 2 वेगेवेगळ्या वेळेस शूट करण्यात आला आहे. यातील पहिल्या शूटमध्ये धोनी बॉलिंग करताना दिसत आहे, तर दुसऱ्या शूटमध्ये तो बॅटिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओ खाली माहीज मल्टीवर्स’ असे कॅप्शन लिहिले आहे. खरं तर यापूर्वी सुद्धा धोनीचे नेट्समध्ये बॉलिंग करतानाचे फोटो व्हायरल झाले होते.

दरम्यान, आयपीएलच्या सुरुवाती पासूनच महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्स या संघाकडून खेळतोय. चेन्नईच्या संघाला यशस्वी संघ करण्यात धोनीचा सिंहाचा वाटा आहे. धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईने तब्बल 4 वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरल आहे. सर्वाधिक आयपीएल चषक जिंकणाऱ्या संघामध्ये चेन्नईचा दुसरा क्रमांक लागतो. 1 नंबरला मुंबई इंडियन्सचा संघ आहे. त्यांनी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली तब्ब्ल 5 वेळा आयपीएल जिंकली आहे.