हैद्राबाद । 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं म्हटलं आहे. कोर्टाच्या या निकालानंतर एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जर मशीद ३२ जणांनी पाडली नाही, तर कुणी पाडली? असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.
सीबीआयच्या विशेष न्यायालयानं निकाल दिल्यानंतर ओवेसी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले,”सीबीआय न्यायालयानं दिलेला निकाल न्यायालयाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद जादूनं पाडण्यात आली होती का? २८ व २९ डिसेंबरच्या रात्री त्या ठिकाणी जादू करून मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या का? राजीव गांधी पंतप्रधान असताना जादूनं कुलूप उघडण्यात आलं होतं का? त्यामुळेच मी म्हणतोय की, सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलं होतं, त्याच्याविरोधात हा निकाल आला आहे. जर तुम्ही हिंसा कराल, तर तुम्हाला मिळून जाईल, असं यातून दिसतं. अडवाणींची रथयात्रा भारतात जिथे कुठे गेली, तिथे हिंसा झाली. लोकांच्या हत्या झाल्या. संपत्ती जाळण्यात आली. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि आज न्यायालयाचा निकाल येतो की ती घटना स्वयंस्फूर्त नव्हती. मग आम्ही विचारतो की, मग स्वयंस्फूर्त असण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो,” असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.
ओवेसी पुढे म्हणाले,” एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो, असं उमा भारती म्हणाल्या होत्या, ही गोष्ट खरी नाही का? बाबरी मशीद पाडली जात सताना मिठाई वाटली जात होती, हे जगानं पाहिलं नाही का? आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती हे सगळे लोक मिठाई खात होते. आनंद व्यक्त करत होते. तुम्ही संदेश काय देऊ इच्छिता. संदेश हाच जातोय की, सामूहिक हिंसा. १९५० पासून या प्रकरणात मुस्लिमांना न्याय मिळालेला नाही. ही मशीद पाडली गेली नसती, तर ९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला असता का? सगळ्या जगानं पाहिले हे लोक व्यासपीठावर उभं राहून भाषणं करत होते. लोकांना चिथावणी देत होते. त्यांच्या उपस्थित हे झालं.
सीबीआयच्या आरोपपत्रात एका साक्षीदारानं असं म्हटलेलं आहे की, त्यावेळचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी असं म्हटलं होतं की, बांधकाम करण्यावर बंदी आहे, पाडण्यावर नाही. हे खरं नाही का? ते पण आपण स्वीकारणार नाहीत. सीबीआयच्या आरोपपत्रात हे म्हटलेलं आहे की, ५ डिसेंबरच्या रात्री आडवणींनी विनय कटियार यांच्या घरात कट रचला. हे खरं नाही का? आडवाणी कल्याणसिंहांना म्हणाले होते, मशीद पडेपर्यंत राजीनामा देऊ नका. या घटनेत न्याय झालेला नाही,” असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.