Indian Railway : ट्रेनमध्ये मिळणार बेबी सीट; महिला आणि बालकांसाठी रेल्वेचे खास गिफ्ट

Indian Railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील लोकांच्या प्रवासाच्या प्रमुख साधनांपैकी रेल्वे हे एक महत्वाचे साधन आहे. दररोज सुमारे लाखो लोक रेल्वेतुन प्रवास करतात. तसेच रेल्वे कडूनही प्रवाशांना खुश करण्यासाठी अनेक सुविधा दिल्या जातात. आता भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे (NR) झोनने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाने लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांसाठी एक स्पेशल सर्व्हिस सुरु केली आहे. या विभागाने लहान मुलांसाठी रेल्वेच्या लोअर बर्थमध्ये एक बेबी बर्थ बसवला आहे.

लखनौ विभागाने जोडला बेबी बर्थ –

लखनौ विभागाने आता लहान बाळांसाठी एक लहान बर्थ जोडला आहे. ज्याला बेबी बर्थ असं म्हणतात. लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांसाठी हा बर्थ खूप उपयुक्त ठरणार आहे. लहान बाळ पडू नये म्हणून या बर्थमध्ये एक स्टॉपर देखील दिला गेला आहे. मात्र ही सुविधा फक्त लोअर बर्थमध्येच उपलब्ध असेल.

‘या’ ट्रेनमध्ये सुरुवात केली गेली –

DRM लखनऊ यांनी आपल्या एका ट्विटमध्ये सांगितले की,’ लखनऊ मेलच्या कोच नंबर 194129/B4, बर्थ नंबर 12 आणि 60 मध्ये बेबी बर्थ सुरू करण्यात आला आहे, जेणेकरून आई आपल्या मुलासोबत सुरक्षितपणे प्रवास करू शकेल. फिट केलेले हे बेबी सीट फोल्ड करण्यायोग्य आणि स्टॉपरसह सुरक्षित आहेत. हे बेबी बर्थ सीट वर आणि खाली देखील केली जाऊ शकेल. सध्या रेल्वेकडून ते फक्त एकाच डब्यातच बसवले गेले आहेत. यानंतर रेल्वे आता प्रवाशांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.