हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bachhu Kadu Meet Raj Thackeray । प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन बच्चू कडू यांनी हि भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये महत्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी बच्चू कडू यांनी राज ठाकरेंना यवतमाळमध्ये होणाऱ्या यात्रेला येण्याचे आवाहन केले. तसेच आम्ही अनेकदा मुंबई बंद झाल्याचे बघितलं, परंतु एकदा शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद व्हावी असं बच्चू कडू यांनी म्हंटल. या भेटीवेळी बाळा नांदगावकर यांच्यासह इतर नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मनसे सोबत आली तर नक्कीच बळ मिळेल- Bachhu Kadu Meet Raj Thackeray
राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर (Bachhu Kadu Meet Raj Thackeray) बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. त्यांनी म्हंटल कि, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच आज राज ठाकरेंची भेट घेतली. मराठवाड्यात जी आमची शेतकऱ्यांसाठी यात्रा निघणार आहे त्या यात्रेला राज ठाकरेंनी यावं आणि शेतकरी म्हणून संभोधित करावं. तसेच मुंबई अनेकदा आम्ही बंद होताना बघितलं, आता शेतकऱ्यांसाठी ती एक दिवस बंद व्हायला पाहिजे. किमान अर्धा तास, एक तास मुंबई शेतकऱ्यांच्या पाठीशी अभीर राहावी असं बच्चू कडू यांनी म्हंटल. शेतकरी हा कोणत्या एका पक्षाचा विषय नाही.. कोणत्याही एका जाती-धर्माचा नाही… त्यामुळे मनसे आमच्या सोबत आली तर नक्कीच शेतकऱ्याला बळ मिळेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, सरकार जे शेतकऱ्यांची टिंगल करत आहे ते काय योग्य नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात की दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करु. त्यामुळे आता दुष्काळ पडण्याची वाटच पाहिली जात आहे का, असा प्रश्न आता पडला आहे. हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला भाव दिला जात नाही, भाव भेटत नसल्याने शेतकरी मरत आहे हे दुष्काळापेक्षा भयंकर असल्याचे बच्चू कडू म्हणाले