उमेदवार शिंदेंचा, पण ठरवणार भाजप.. अफलातून कारभार झालाय; बच्चू कडूंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमध्ये जागावाटपावरून अनेकदा वाद पाहायला मिळाले. लोकसभा निवडणूक संपली असली तरी विधानसभा निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाच्या अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली होती, यामागे भाजपचा हात आहे अशा चर्चाही त्यावेळी सुरू होत्या. आता मात्र महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी भाजपवर निशाणा साधत शिंदेंचे उमेदवार भाजप ठरवतो असं म्हंटल आहे. बच्चू कडू यांनी काही उदाहरणे सुद्धा दिली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, हिंगोली लोकसभेत हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी नाकारण्यात आली. उमेदवार शिवसेना शिंदेंचे आणि त्यांना उमेदवारी द्यावी की नाही? हे भाजपाकडून ठरविले जात असेल तर हा अफलातून कारभार आहे. अजित पवार यांचेही उमेदवार भाजपने ठरवले होते. दोन उमेदवार पडणार असल्याचे सांगून ते बदलण्यास सांगितले गेले. याउलट अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका, असे जिल्ह्यातील भाजपा नेते सांगत असतानाही त्यांना उमेदवारी दिली गेली. हा एकप्रकारे गेमच होता. अमरावतीमध्ये सर्व्हे नकारात्मक असतानाही उमेदवार बदलला नाही आणि शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार तुम्ही बदलण्यास भाग पाडले. घटक पक्षांना बरोबर घेऊन अशा प्रकारचे वागणे चुकीचे आहे. या वृत्तीमुळे भाजपवर कोणी विश्वास ठेवणार नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर संताप व्यक्त केला.

दरम्यान, बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहिलं असून या संपूर्ण प्रकरणाची. सखोल चौकशी करावी आणि संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. मात्र या एकूण सर्व प्रकारामुळे अमरावतीत खळबळ उडाली आहे. तसेच बच्चू कडू यांच्या मागावर नेमकं आहे तरी कोण? असा प्रश्न निर्माण झालाय. माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत. अपघात झाल्याची कोणीतरी अफवा पसरवत आहे, असं बच्चू कडू यांनी सदर पत्रात म्हटलं आहे. भाऊ तुमचा अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे? असे काही प्रश्न या फोनवरुन बच्चू कडू यांना विचारले जातात. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधीतावर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची मागणी बच्चू कडू यांनी पत्रातून केली आहे. सध्या बच्चू कडू याना पोलिसांनी वाय प्लस सुरक्षा दिली आहे.