हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा आघाडीचा अष्टपैलू हार्दिक पांड्या गेल्या सप्टेंबर महिन्यापासून भारतीय संघाबाहेर आहे. ऑक्टोबर महिन्यात त्याच्या पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पंड्या आगामी इंडियन प्रीमियर लीगपर्यंत (आयपीएल) पुनरागमन करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ‘‘पुनर्वसनाच्या कार्यक्रमादरम्यान संयम बाळगणे तसेच आपल्यावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञमंडळींचे म्हणणे ऐकणे महत्त्वाचे असते. पुनरागमन करताना आपण प्रदीर्घ काळ खेळू शकतो की नाही, याचा अंदाज घेऊनच परतण्याची घाई करावी असा सल्ला भारताचा माजी वेगवान गोलंदाज जाहीर खान याने पांड्याला दिला आहे.
तो पुढे म्हणाला, ”मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलला अद्याप बराच कालावधी आहे. पण पुनरागमन करण्यासाठी पांड्याने १२० टक्के तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे. माझ्या अनुभवावरून हा सल्ला मी पांड्याला देत आहे,’’ असे झहीर म्हणाला. झहीर सध्या मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट संचालकाची भूमिका पार पाडत आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.