Bajaj चेतक E- Scooter चे ‘प्रीमियम एडिशन’ लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ठ्ये
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी बजाजने तिची एकमेव इलेक्ट्रिक स्कुटर बजाज चेतक नव्या प्रिमिअम एडिशन मध्ये लाँच केली आहे. ही बजाज इलेक्ट्रिक स्कूटर ओकिनावा iPraz Plus, TVS iQube इलेक्ट्रिक, Vida V1 सारख्या स्कूटरशी स्पर्धा करते. आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया या स्कुटरचे खास वैशिष्ठ्ये आणि तिच्या किमतीबाबत…
फीचर्स –
बजाज चेतक प्रिमिअम एडिशन तुम्हाला 3 रंगांमध्ये मिळेल. ज्यामध्ये मॅट कोर्स ग्रे, मॅट कॅरिबियन ब्लू आणि सॅटिन ब्लॅक रंगाचा समावेश आहे. बजाज चेतक प्रीमियम एडिशन पूर्णपणे मेटल बॉडीसह येते. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कुटरला प्रिमिअम लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, प्रीमियम टू-टोन सीट्स, रियर व्ह्यू मिरर, सॅटिन ब्लॅक ग्रॅब रेल आणि मॅचिंग पिलियन फूटरेस्ट कास्टिंग्ज स्कुटरचा क्लासिक लुक आणखी वाढवतात.
किती किलोमीटर रेंज –
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचा पॉवर पॅक पूर्वीसारखाच ठेवण्यात आला आहे, या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 50.4V सह 57.24ah आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही स्कुटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 तासांचा वेळ लागतो. मात्र एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर या इलेक्ट्रिक स्कुटरची सध्याची रेंज 90 किमी आहे. मात्र अपडेटेड चेतकमध्ये हीच रेंज 108 किमी पर्यंत जाऊ शकते.
किंमत –
गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, बजाज चेतकची सुरुवातीची किंमत 1,21,933 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. तर प्रीमियम एडिशन बजाज चेतकची किंमत 1,51,910 रुपये (एक्स-शोरूम, बेंगळुरू) पासून सुरू होते. या स्कुटरचे बुकिंग सुरू झाले आहे. मात्र एप्रिल 2023 नंतर या स्कुटरची डिलिव्हरी सुरू होईल.