Bajaj CNG Bike Launched : जगातील पहिली CNG Bike लाँच; 330 KM पर्यंत मायलेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध ऑटोमोबाईल निर्माता कंपनी बजाजने जगातील पहिली CNG बाईक लाँच (Bajaj CNG Bike Launched) केली आहे. Bajaj Freedom CNG असे या गाडीचे नाव असून ऑटोमोबाईल विश्वातील ही नवी क्रांती म्हणावी लागेल. कारण यापूर्वी आपण CNG कार बघितल्या असतील परंतु CNG बाईक आजपर्यंत बाजारात आली नव्हती. आता मात्र बजाज कंपनीने CNG बाईक बाजारात आणली असून या गाडीमुळे ग्राहकांचे पेट्रोलची चिंता मिटणार आहे तसेच आर्थिक ताण सुद्धा कमी होणार आहे. बजाज कंपनीची हि सीएनजी बाईक बाजारात चांगलाच धुमाकूळ घालेल असं बोलल जात आहे. या सीएनजी बाइकमध्ये नेमकं काय खास आहे? ती किती किलोमीटर पर्यंत रेंज देईल आणि तिची किंमत किती असेल याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

लूक आणि डिझाईन-

बजाज ऑटोने ही बाईक कम्युटर सेगमेंटमध्ये लॉन्च केली (Bajaj CNG Bike Launched) आहे. या बाईकचा लूक आणि डिझाईन अतिशय अप्रतिम असा आहे. या बाइकमध्ये CNG सिलेंडर ठेवलाय कुठे तेच तुम्हाला समजणार नाही इतक्या मस्त आणि आकर्षक डिझाईनमध्ये ही गाडी तयार करण्यात आली आहे. गाडीच्या सीटच्या खाली सीएनजी टाकी बसवण्यात आली आहे. यामध्ये २ किलोचा सीएनजी सिलेंडर आणि २ लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. यामध्ये हिरवा रंग CNG आणि नारंगी रंग पेट्रोल असल्याचे दर्शवते.

330 किलोमीटरपर्यंत मायलेज-

बजाजच्या या पहिल्या CNG बाइकमध्ये 125 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर चालू शकते. हे इंजिन 9.5PS पॉवर आणि 9.7Nm टॉर्क जनरेट करते. बजाज ऑटोचा दावा आहे की या बाईकमुळे ग्राहकांना पेट्रोल +CNG अशा दोन्ही इंधनांवर एकूण 330 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळेल. पेट्रोलवरून सीएनजी आणि सीएनजीवरून पेट्रोलवर जाण्यासाठी बाइकमध्ये एक बटण देण्यात आले आहे. कंपनीने बजाज फ्रीडम डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक आणि दोन्ही ब्रेकिंग सिस्टमसह लाँच केली आहे.

किंमत किती? Bajaj CNG Bike Launched

बजाज कंपनीने या आपल्या पहिल्या CNG बाईकच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, तिच्या ड्रम व्हेरिएंटची किंमत 95 हजार रुपये, ड्रम एलईडी व्हेरिएंटची किंमत 1.05 लाख रुपये आणि टॉप डिस्क व्हेरिएंटची किंमत 1.10 लाख रुपये आहे. हि बाईक कॅरिबियन ब्लू, इबोनी ब्लॅक-ग्रे, प्युटर ग्रे-ब्लॅक, रेसिंग रेड, सायबर व्हाईट, प्युटर ग्रे-येलो, इबोनी ब्लॅक-रेड रंगांमध्ये उपलब्ध आहे.