हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bajaj Finance : फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वांत लोकप्रिय पर्याय आहे. यामध्ये पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच चांगला रिटर्न देखील मिळतो. सध्याच्या काळात फिक्स्ड डिपॉझिट वरील व्याज दरात सातत्याने वाढ होते आहे. आता FD मध्ये गुंतवणूक करण्याची संधी शोधत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आली आहे. आता नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी असलेल्या बजाज फायनान्स लिमिटेडने 39 महिन्यांच्या डिपॉझिटच्या कालावधीसाठी एक स्पेशल प्लॅन सुरू केला आहे. ज्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.85 टक्के तर सामान्य नागरिकांना 7.60 टक्के दराने व्याज दिले जाईल.
मंगळवारपासून Bajaj Finance लिमिटेडचा हा स्पेशल प्लॅन लागू झाला आहे. हे लक्षात घ्या कि, या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 7.95 टक्के व्याज मिळू शकेल, मात्र त्यासाठी त्यांना 44 महिन्यांसाठी एफडीमध्ये पैसे गुंतवावे लागतील. या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 7.70 टक्के व्याजदर दिला जातो आहे. सामान्य नागरिकांना 12 ते 23 महिन्यांच्या कम्युलेटिव्ह एफडीवर 6.80 टक्के तर 15 महिन्यांच्या स्पेशल एफडी अंतर्गत 6.95 टक्के व्याजदर मिळेल.
12 ते 16 महिन्यांसाठी FD
दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांना 12 ते 23 महिन्यांच्या कम्युलेटिव्ह एफडीवर 7.05 टक्के तर 15 महिन्यांच्या स्पेशल एफडीवर (ज्येष्ठ नागरिकांना) 7.20 टक्के दराने व्याज मिळेल. आता कंपनीकडून ग्राहकांना 12 ते 60 महिन्यांच्या कालावधीसह FD सुरू करण्याची परवानगी देत आहे. Bajaj Finance
व्याजदरात केली वाढ
बजाज फायनान्स लिमिटेडचे फिक्स्ड डिपॉझिट्स आणि गुंतवणूक कार्यकारी उपाध्यक्ष असलेले सचिन सिक्का म्हणाले कि, “याआधी आम्ही व्याज दरात 6 महिन्यातून एकदा बदल करत असू, मात्र यावर्षी जास्त वेळा बदलण्यात आले आहेत. यावेळी सुमारे 25 बेसिस पॉइंट्सच्या वाढीसह, आम्ही 39 महिन्यांच्या नवीन कालावधीसाठी ही योजना देखील सुरू करत आहोत.” Bajaj Finance
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.googleadservices.com/pagead/aclk?sa=L&ai=DChcSEwj7tuLT68H7AhUVmWYCHY2kDCkYABAAGgJzbQ&ohost=www.google.com&cid=CAESbeD21lHbLAYWpfHgZIQM0-3s4_Xv9Zt035T_Lk5Got6YOVzoaahCNCNgIj_dFRLB1sV1HbjSnIH5davpQQtO6JgmPFm370ub2ltXeBBpp9DAqhcU_S2dlzSX_rsZSHgWQT-RPsVAKhZBvL8XqZY&sig=AOD64_37WqmXZ30errl_5X8Ji7fLz4dfxg&q&adurl&ved=2ahUKEwjqydHT68H7AhVmZWwGHW4GC8YQ0Qx6BAgJEAE
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षात गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
आता इंटरनेटशिवायही करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
Train Cancelled : आजही रेल्वेने रद्द केल्या 185 गाड्या !!! अशा प्रकारे तपासा आपल्या ट्रेनचे स्टेट्स
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ, आजचे नवीन दर तपासा
Saving Account : ‘या’ बँकांच्या बचत खात्यावर मिळेल 7-7.50% पर्यंतचा व्याजदर