हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election? काळात अजित पवार (Ajit Pawar) गटाला एक मोठा झटका बसला आहे. आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पाठोपाठ बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वर टाकला आहे. त्यामुळे आता बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास बजरंग सोनावणे यांना शरद पवार (Shrad Pawar) गटाकडून बीड लोकसभेची उमेदवारी मिळू शकते.
महत्वाचे म्हणजे, भाजपने बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली असली तरी याचं मतदारसंघातून उभे राहण्यासाठी बजरंग सोनवणे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे शरद पवार गटात आल्यानंतर सोनवणे यांना महाविकास आघाडीकडून बीडमधून उमेदवारी दिली जाऊ शकते. असे झाल्यास यामुळे पंकजा मुंडे यांचे टेन्शन नक्कीच वाढेल. कारण यापूर्वी 2019 साली खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे यांनी निवडणूक लढवली होती.
त्यामुळेच आता देखील बजरंग सोनवणे बीड लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु त्यांना अजित पवारकडून बीडमधून उमेदवारी मिळण्याचे सर्व दरवाजे बंद झाले आहे. यामुळेच त्यांनी अजित पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा दिल्यानंतर आज दुपारी साडेचार वाजता बजरंग सोनवणे शरद पवार गडात प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कारण आजच शरद पवार यांनीही बीड लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलवली आहे.
दरम्यान, यापूर्वी निलेश लंके यांनी अजित पवार गटातून बाहेर पडत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांनाही ते इच्छुक असलेल्या मतदारसंघातूनच उमेदवारी देण्यात येईल असे सांगितले जात आहे. त्यानंतर आता बजरंग सोनवणे यांनी देखील अजित पवार गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा परिणाम अजित पवार गटावर होईल की नाही, हे चित्र आगामी निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे