हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे वयाच्या ८५ व्या वर्षीही संपूर्ण महारष्ट्रात झंझावाती प्रचार करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत शरद पवार लढत आहेत. मागील २० दिवसात शरद पवारांच्या तब्बल ५० सभा महाराष्ट्रात पार पडल्या आहेत. मात्र बारामतीमधील शेवटची सभा संपेपर्यंत शरद पवार यांची प्रकृती बरीच बिघडली होती. घसा बसल्यामुळे त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवाही जाणवत होता. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस आराम करण्याची विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. साहेब, तब्येतीला जपा! आम्ही लढून विजय तुमच्या पायाशी आणून ठेवतो, असं त्यांनी म्हंटल आहे.
बजरंग सोनवणे यांची पोस्ट जशीच्या तशी –
साहेब, तब्येतीला जपा!
तब्येतीच्या कारणास्तव उद्या माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही.. तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. मागील पाच-सहा दशके अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील तुम्ही. तुमच्या नावावरच झाल्या त्या! मागील कित्येक दशके महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानानं आव्हान देतो. पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा.
साहेब, तब्येतीला जपा!
— Bajrang Sonwane (@bajrangsonwane_) May 5, 2024
तब्येतीच्या कारणास्तव उद्या माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही..
तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. मागील… pic.twitter.com/xToiT59d2M
लढणं, तेही विपरीत परिस्थितीत, तुम्ही या देशाला दाखवून दिलंय. विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या! साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त, तब्येतीला जपा साहेब. आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहुद्या.
~ तुमचा,
बजरंग बप्पा!